बदलत्या हवामानाचा आंबा उत्पादकांना फटका, झाडावरील आंबे गळून पडू लागल्यामुळे लाखो रूपयांचे नुकसान
झाडाखाली आंब्यांचा खच पडला, यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात मागच्या कित्येक दिवसांपासून हवामानात सतत बदल होत आहे. सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे.
कल्याण : मागील अनेक दिवसापासून वातावरणात बदल (climate change) व तापमानात (temprature) झालेली वाढ ह्याचा फटका शहापूरातील आंबा उत्पादकांना बसला आहे. दोन दिवसापासून वाशाळा येथील शेतकरी उमेश धानके यांच्या आमराईतील आंब्यांवरील सर्व आंबे (mango)गळून मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी 300 आंब्याची झाडांमधून त्यांना सात ते आठ लाख रुपये इतके उत्पन्न मिळते. यावर्षी ही तितकेच उत्पन्न आपल्याला मिळेल या आशेत होते. मात्र गेल्या तीन दिवसांच्या वाढत्या तापमानामुळे आंब्यावरती मोठ्या परिणाम झाला आणि हे आंबे झाडावरून गळून पडायला सुरुवात झाली. झाडाखाली आंब्यांचा खच पडला, यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात मागच्या कित्येक दिवसांपासून हवामानात सतत बदल होत आहे. सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे.
कर्नाटकमधील आंबा हापूसच्या नावाखाली विक्रीला स्थानिक अंबाबागातदारांचा दुसऱ्या दिवशी सुद्धा विरोध केला आहे. रत्नागिरीमधील आंबा बागायतदारांची धाड रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनवर पडली आहे. हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री करीत असल्याचं लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तिथल्या आंबा विक्रेत्यांतकडे मोठा साठा सापडला. कर्नाटकी आंब्याच्या विरोधात स्थानिक बागायतदार आक्रमक झाले आहेत. आंब्याची आंबा बागायतदारांकडून रेल्वे स्थानकावर विक्रेत्यांची झाडाझडती घेतली आहे. आंबा बागायतदार आणि आंबा विक्रेते यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली आहे. सध्या आंब्याचा सीजन सुरु आहे. राज्यातील परराज्यातील विविध पद्धतीचे आंबे विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. परंतु अनेकदा फसवणूक होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
वाढत्या तापमानाचा केळी पिकांना मोठा फटका
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. या वाढत्या उन्हाचा केळी पिकांना मात्र मोठा फटका बसला आहे. अति उन्हामुळे केळीचे घड गळून पडणे, पाने सुकणे हे परिणाम केळी पिकांवर होऊ लागले आहे. शेतकऱ्यांनी उष्णतेपासून पिकांना वाचवण्यासाठी सुकलेल्या पानांच्या घोंगडीचे घडावर पांघरून घातले आहे. राज्यात खरीप हंगामा अतिवृष्टीमुळे पुर्णपणे वाया गेला, तर रब्बी हगाम अवकाळी पावसामुळे गेला. नेमकं काय करावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.