Drone farming technology : आधुनिक शेती करायचीय? मग मनसुख मांडवीय यांनी Share केलेला ‘हा’ Video पाहाच

| Updated on: Feb 12, 2022 | 11:39 AM

Drones using for spraying pesticides : ड्रोनचा वापर पिकांच्या संरक्षणासाठी ड्रोनद्वारे कीटकनाशकांचा (Pesticides) वापर करता येतो. एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होतोय. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.

Drone farming technology : आधुनिक शेती करायचीय? मग मनसुख मांडवीय यांनी Share केलेला हा Video पाहाच
ड्रोनद्वारे युरियाची फवारणी
Follow us on

Drones using for spraying pesticides : शेतकर्‍यांचा शेतीवरील खर्च कमी व्हावा आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी शेतीच्या नवनवीन तंत्रांना चालना दिली जात आहे. कृषी ड्रोन हे देखील शेतीच्या आधुनिक साधनांपैकी एक आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. ड्रोनचा वापर पिकांच्या संरक्षणासाठी ड्रोनद्वारे कीटकनाशकांचा (Pesticides) वापर करता येतो. यासंबंधीचा एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जे केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या 34 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की शेतातील किडींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी ड्रोनद्वारे नॅनो युरियाची फवारणी केली जात आहे. त्याचवेळी आजूबाजूला उपस्थित असलेले लोक हा ऐतिहासिक क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत. शेतकरी हाताने आणि यंत्राद्वारे शेतात खतांची फवारणी करत असले तरी हे दृश्य पाहून देशातील शेतकऱ्याचाही काळाबरोबर विकास होत असल्याचे दिसून येते.

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर भर

हा व्हिडिओ शेअर करताना केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी लिहिले, की ही नवीन भारताची शेती आहे. नॅनो युरिया + अॅग्रीकल्चर ड्रोन, पंतप्रधान @NarendraModi जी यांनी नेहमीच नावीन्य आणि तंत्रज्ञानावर भर दिला आहे. IFFCOद्वारे उत्पादित द्रव नॅनो युरियाची कृषी ड्रोनद्वारे चाचणी फवारणी मानसा, गांधीनगर येथे करण्यात आली. त्यामुळे शेतीचे उत्पन्न वाढेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूझर्स आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

व्हिडिओचे कौतुक

सोशल मीडियावर या व्हिडिओला लोक मोठ्या प्रमाणात पसंती देत ​​आहेत. यामुळेच अनेक यूझर्सनी व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. एका यूझरने म्हटले, की नवीन भारताची नवीन शेती. याशिवाय इतर अनेक यूझर्सनी या व्हिडिओचे वेगवेगळ्या प्रकारे कौतुक केले.

काय आहे कृषी ड्रोन तंत्रज्ञान?

शेतात कोणतेही खत फवारले तर त्यासाठी शेतकऱ्याला शेतात उतरावे लागते. यासोबतच असे कोणतेही खत हाताने फवारले जाते. कधीकधी खतांचे असमान वितरण होते. कृषी ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे ड्रोनमध्ये द्रव युरिया भरला जातो. याच्या मदतीने ड्रोनला एका ठराविक उंचीवर नेले जाते. त्यानंतर तेथून युरियाची फवारणी केली जाते.


शेतकऱ्यांना होईल फायदा

शेतकरी जेव्हा शेतात युरिया फवारणीसाठी जातो तेव्हा अनेक वेळा त्याला पाणी साचलेल्या किंवा चिखलाच्या शेतात उतरावे लागते. कृषी ड्रोन तंत्रज्ञानाच्या आगमनाने, शेतकऱ्यांना अशा कोणत्याही शेतात उतरावे लागणार नाही, ज्यामुळे त्यांच्या पायाला त्रास होणार नाही. गाळात अतिप्रमाणात घुसल्याने अनेक वेळा शेतकऱ्यांचे तळवे खराब होतात. नवीन तंत्रज्ञानामुळे अशा कोणत्याही संकटापासून शेतकरी वाचणार आहेत.

आणखी वाचा : 

काय सांगता? शास्त्रीय संगीत ऐकूण गायीच्या दूध उत्पादनात वाढ, तरुण शेतकऱ्याचा अनोखा अंदाज

Banana Rate: सर्वकाही नियोजनाप्रमाणे, वातावरण निवळले, केळीची आवक सुधारली अन्…

Photo : कोल्हापूरातील द्राक्ष महोत्सवाचा थेट ग्राहकांना लाभ, संकटावर मात करुन द्राक्षांचा गोडवा कायम