पुणे : कधी नव्हे ते दूध दरात वाढ होत आहे. गतमहिन्यात (Cow Milk Rate) गायीच्या दूध दरात वाढ झाली तर आता गोकूळ आणि वारणा यांनी म्हशीच्या दूध दरात लिटरमागे 3 रुपयांची वाढ केली आहे. दूध दर वाढीची नामुष्की ही वाढत्या मागणीमुळे नव्हे तर उत्पादनात घट झाल्यामुळे ओढावली आहे. यासंदर्भात (Milk producers) दूध उत्पादक संघानेच स्पष्टीकरण दिले आहे. दूध दरात वाढ होऊनही शेतकऱ्यांना म्हणावा तेवढा फायदा झालेला नाही. कारण दूध उत्पादनात घट झालेली आहे तर दुसरीकडे (Animal feed rates) पशूखाद्याचे दरही वाढलेले आहेत. म्हशीचे दूध हे लिटरमागे 3 रुपयांनी वाढले आहे. वाढत्या दराची अंमलबजावणी करण्यासही सुरवात झाली आहे. अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जनावरांची योग्य काळजी घेतली तर उत्पादनात वाढ होणार आहे. वाढत्या दूध दराचा फायदा घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्यांना दुभत्या जनावरांची काही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
वाढत्या उन्हाचा सर्वाधिक परिणाम हा जनावरांवर होतो. विशेषत: म्हशींच्या अंगाची तर लाहीलाही होते. त्यामुळे चारा खाण्यापेक्षा म्हशी गारव्याला थांबणेच अधिक पसंत करतात. उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याचीही कमतरता असते. सध्या जनावरांना केवळ कडबा आणि बुस्कट याचाच आधार घ्यावा लागतो. शिवाय जनावरे चारण्यासाठी हिंडवली तर त्याचा दूध उत्पादन वाढीवर अनुकूल परिणाम होतो. पण सध्याच्या वाढत्या उन्हामुळे जनावरे ही दावणीलाच बांधलेली आढळू येत आहे. आणि चारण्यासाठी सोडली तरी उन्हाच्या चटक्यांपासुन आधार मिळावा यासाठी म्हशी आता थेट पाण्यातच जाऊ बसु लागल्या आहेत. त्यामुळे दूध उत्पादनात घट ही शेतकऱ्यांना जाणवत आहे.
जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी देण्याऐवजी समान विभागणी करून 3 ते 4 वेळेस द्यावा लागणार आहे. चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी. चारा तसाच टाकला तर 30 टक्के वाया जातो. हिरवा चारा उपलब्ध असल्यास वाळलेला चारा यांचे मिश्रण करावे. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडाल्याने जनावरे अधिक आवडीने चारा खातात.अति उष्णतेचा जनावरांच्या आहारावर, दूध उत्पादनावर व प्रजननक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो, म्हणून जनावरांना रांजणातील पाणी पाजावे.
मूळात म्हैस गायीच्या तुलनेत कमी दूध देते पण उन्हाळ्यात हे प्रमाण निम्म्यावरच येते. कारण वाढत्या उन्हामध्ये जनावरांना योग्य असा हिरवा चारा मिळत नाही. शिवाय जनावरे 24 तास ही एकाच जागी दावणीला असातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी किमान म्हशीला दिवसातून किमान एकदा तरी धुऊन काढावे लागणार आहे. शिवाय एकाच जागी बांधून ठेवण्यापेक्षा ऊन कमी झाल्यावर जनावरांना चरण्यासाठी हिंडवावे लागणार आहे.
Nanded : उन्हामुळे गावरान काकडीला विक्रमी दर, शेतकऱ्यांनीच घेतलं Market ताब्यात
Sangola : वातावरणातील बदलाने डाळिंब बागा उध्वस्त, शेतकरी परिषदेत नेमका तोडगा काय?