Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काशीफळ, दुधी भोपळा पीक 3 महिन्यांचे, पण उत्पन्न लाखोंचे; कसे कराल व्यवस्थापन?

काळाच्या ओघात शेती व्यवसायही कमर्शिअल होत आहे. ज्या पिकातून अधिकचे उत्पन्न अशा पिकावरच शेतकऱ्यांचे लक्ष आहे. बाजारपेठेचा अभ्यास, तंत्रशुध्द पध्दतीने लागवड आणि कमी वेळेत अधिकचा मोबदला यासाठी सर्वकाही करण्याची तयारी शेतकरी दर्शवत आहेत. काशीफळ भोपळा या हंगामी पिकातूनही भरघोस उत्पादन घेता येते.तीन महिन्याचे हे पीक असून बियाणे निवडीपासून ते मार्केटपर्यंतचा अभ्यास केला तर एका एकरात लाखोंचे उत्पन्न शेतकऱ्यांनाच मिळतेच.

काशीफळ, दुधी भोपळा पीक 3 महिन्यांचे, पण उत्पन्न लाखोंचे; कसे कराल व्यवस्थापन?
काशीफळ भोपळा
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 5:10 AM

लातूर : काळाच्या ओघात (Farming) शेती व्यवसायही कमर्शिअल होत आहे. ज्या पिकातून अधिकचे उत्पन्न अशा पिकावरच शेतकऱ्यांचे लक्ष आहे. बाजारपेठेचा अभ्यास, तंत्रशुध्द पध्दतीने लागवड आणि कमी वेळेत अधिकचा मोबदला यासाठी सर्वकाही करण्याची तयारी शेतकरी दर्शवत आहेत. काशीफळ (Pumpkin Crop) भोपळा या (Seasonal Crop) हंगामी पिकातूनही भरघोस उत्पादन घेता येते.तीन महिन्याचे हे पीक असून बियाणे निवडीपासून ते मार्केटपर्यंतचा अभ्यास केला तर एका एकरात लाखोंचे उत्पन्न शेतकऱ्यांनाच मिळतेच. काशीफळ हे वेलवर्गीय पीक उत्पादन खर्च आणि लागवड व्यवस्थापनाचा विचार करता शेतकऱ्यांना परवडणारे आहे. सणासुदीसह वर्षभर या फळांची मागणी भाजी व गोड पदार्थांसाठी वाढत आहे. यामध्ये जीवनसत्व अधिक असल्याने आरोग्यासाठीही हे चांगले असते.

अशी करा लागवड अन् जोपासणा

काशीफळ भोपळा हे 90 दिवसांमध्ये पदरी पडणारे पीक आहे. हे एक हंगामी पीक असून लागवडीपूर्वी शेतीची मशागत करणे गरजेचे आहे. त्यानंतर बेड पध्दतीने बियाणांची लागवड केली तर उत्पादनात भर पडणार आहे. लागवडीनंतर खताचा डोस हा ठिबक सिंचनाद्वारेच दिला तर त्याचा अधिक परिणाम होतो. पहिला डोस झाल्यानंतर वॉटर सोल्यूशनद्वारे दर चार दिवसाला औषध फवारणी करावी लागते. तर खुरपणी, कुळवणी करुन हे पीक जोपासावे लागते. पूर्वी परसबागेत किंवा शेतात कुठेतरी बांधावर, कोपऱ्यातील मोकळ्या जागेत एक दोन वेलीची लागवड केली जाई. बहुतांश वेळी आपोआप बिया पडून उगवून येणारे हे दुर्लक्षित वेलवर्गीय वनस्पती आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून उपयुक्त खाद्य म्हणून विशेष करून शेतामध्ये लागवड होऊ लागली आहे.

भोपळ्यातील पोषक घटक

यात अ, क आणि इ जीवनसत्त्व असून, बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असते. प्रथिने, प्रोटीन, कर्बोदके, कॉपर, पोटॅशिअम, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम यांचेही चांगले प्रमाण असते. काशीफळाच्या सेवनाने हृदयाचे व डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, थकवा कमी होतो. आपल्याकडे श्रावणातील विविध सणांमध्ये या फळाला मोठी मागणी असते. ही भाजी उपवासाला देखील चालते. दक्षिण भारतात सांबरामध्ये प्राधान्याने वापर केला जातो.याची पाने, नवीन शेंडा, फुले, फळे व बी अशा सर्व घटकांचा आहारात वेगवेगळ्या प्रकारे समावेश होतो.

दोन्ही हंगामात घेता येते उत्पादन

उन्हाळी आणि खरीप हंगामातही भोपळ्याचे उत्पादन घेता येते. मात्र, याचे सोयाबीनप्रमाणेच आहे. जसा खरीप सोयाबीनला अधिकचा उतारा पडतो अगदी त्याप्रमाणेच खरिपात लागवड केलेल्या भोपळ्याचे उत्पादन वाढते तर उन्हाळी हंगामात उत्पादन हे कमी येते. खरीप हंगामात 2 ते 3 पाऊस चांगले झाले की जून किंवा जुलैमध्ये लागवड केली जाते. उन्हाळी हंगामात उपलब्ध पाण्याच्या भरवश्यावर पीक घ्यावे लागते. जानेवारी ते मार्च दरम्यान लागवड केली जाते.

संबंधित बातम्या :

Latur Market : खरेदी केंद्रावर हरभरा दराची हमी, बाजारपेठेतली आवक निम्याने घटली, सोयबीनही स्थिरावले

Video: अमरावती बाजारसमितीत हमालाची गुंडगिरी, शेतकऱ्याला मारहाण, बाजारसमितीचं कारवाईचं आश्वासन

Agricultural Pump : विद्युत पुरवठ्याचा कालावधी ठरला आता वीज तोडणी मोहीम बंद करण्यासाठी आंदोलन

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.
संतोष देशमुख हत्या प्रकरण: गाडीचा फॉरेन्सिक रिपोर्ट काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरण: गाडीचा फॉरेन्सिक रिपोर्ट काय?.
निर्घृण हत्येनंतर..., संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक पुरावा उघड
निर्घृण हत्येनंतर..., संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक पुरावा उघड.
'माझी इच्छा नसतानाही पुरूष...', पीडितेचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप
'माझी इच्छा नसतानाही पुरूष...', पीडितेचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप.