नवी दिल्ली : हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार प्रत्येकवर्षी मान्सून केरळमध्ये (Kerala) १ जूला प्रवेश करतो. त्यामध्ये कधी-कधी पुढे पाठी होण्याची शक्यता असते. परंतु यावर्षी मान्सून (Monsoon Updates) उशीरा दाखल होणार असल्याची हवामान खात्याने जाहीर केली आहे. दक्षिण राज्यात मागच्या दोन वर्षात पाऊस १ जूनला दाखल झाला होता. त्याचबरोबर यावर्षी मान्सून सुरुवातीला कमी प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपुर्व शेतीची तयारी सुरु झाली आहे. ज्या लोकांना पेरणी करायची त्यांनी आपल्या शेतीची मशागत करायला सुरुवात केली आहे. केरळमधून पाऊस पुढे सरकण्यासाठी वातावरण पोषक राहणार आहे. देशात मान्सून दाखल झाल्यानंतर लोकांनी गर्दीपासून सुटका होणार आहे.
आईएमडी अधिकारी कुलदीप श्रीवास्तव यांनी मे महिन्यात पहिल्या दोन आठवड्यात अधिक तापमान असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. देशात अनेक राज्यात तापमानाचा पारा अधिक वाढला आहे. पुढचे सात दिवस राज्यातील असंच राहणार आहे. तापमान कमी होण्याची आशा करु नका, देशातील तापमान अजून वाढण्याची शक्यता आहे. 40 डिग्री सेल्सियसच्या पुढे पाठी देशात अनेक ठिकाणी तापमान राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
त्यांनी सांगितलं आहे की, हरियाणा, दिल्ली-एनसीआर, पश्चिम उत्तर प्रदेश उत्तर-पूर्व राजस्थान या राज्यात हवा अधिक वेगाने सुरु आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे एक वेस्टर्न डिस्टर्बन्स निघून गेला असून जोरदार वारे वाहत आहेत.आईएमडी अधिकारी कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितलं की, मागच्यावेळी तापमान अधिक होतं. सध्या अनेक राज्यात वारे 40-45 किमी वेगाने वाहत आहेत. हवेचा वेग इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की, धूळ मोठ्या प्रमाणात उडत आहे.