बारमाही मागणी असलेल्या डाळिंबातून कमी काळात अधिकचे उत्पन्न, लागवडीच्या वेळी घ्यावी लागणार ‘ही’ काळजी..!

हंगाम कोणताही असो केळी प्रमाणेच डाळिंबालाही बाजारपेठेत बारमाही मागणी असतेच. यामध्ये व्हिटॅमिन के, सी आणि बी, लोह, पोटॅशियम, झिंक आणि ओमेगा 6 फॅटी अॅसिड सारखे पोषक घटक असतात. मानवी आरोग्यासाठी महत्वाचे मानले जातात. यामुळे डाळिंबाला मागणी ही कायमची असते. शिवाय डाळिंबासाठी उत्तम दर्जाचीच शेतजमिन असावी असे काही नाही.

बारमाही मागणी असलेल्या डाळिंबातून कमी काळात अधिकचे उत्पन्न, लागवडीच्या वेळी घ्यावी लागणार 'ही' काळजी..!
राज्यात डाळिंबाचे क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न सुरु केले आहेत.
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 4:37 PM

मुंबई : हंगाम कोणताही असो केळी प्रमाणेच (Pomegranate Market) डाळिंबालाही बाजारपेठेत बारमाही मागणी असतेच. यामध्ये व्हिटॅमिन के, सी आणि बी, लोह, पोटॅशियम, झिंक आणि ओमेगा 6 फॅटी अॅसिड सारखे पोषक घटक असतात. (Importance of pomegranate) मानवी आरोग्यासाठी महत्वाचे मानले जातात. यामुळे डाळिंबाला मागणी ही कायमची असते. शिवाय डाळिंबासाठी उत्तम दर्जाचीच शेतजमिन असावी असे काही नाही. हलक्या प्रतीच्या जमिनीतूनही (Production of more) अधिकचे उत्पादन घेता येते. यामधून कमी खर्चात अधिकचे उत्पादनही सहज शक्य आहे. हंगामाच्या सुरवातीला थोडा खर्च केला तर पुन्हा तोडणीपर्यंत अधिकचा खर्च हा नसतोच. त्यामुळे उत्पादन तर मिळतेच शिवाय काळाच्या ओघात आता यामध्ये यंत्राचा वापरही वाढला आहे. लागवडी दरम्यानचे योग्य नियोजन हेच उत्पादन वाढीसाठी महत्वाचे ठरणार आहे. देशामध्ये डाळिंबाची लागवड ही उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांत जास्त प्रमाणात केली जाते. लागवडीनंतर तीन ते चार वर्षात फळधारणा होऊ शकते. त्यानंतर मात्र, 25 वर्षे फळ येऊ शकतात.

हे आहेत डाळिंबाचे उत्तम वाण

ज्योतीची जात- या वाणाची फळे काराने मध्यम ते मोठी असतात, त्यांचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो व पिवळसर लाल रंगाचा असतो. बिया मऊ आणि चवीला गोड असतात.

मृदुला वाण – याची फळे मध्यम आकाराची गुळगुळीत पृष्ठभाग असलेली गडद लाल रंगाची असतात. बिया मऊ व लाल रंगाच्या, बिया रसाळ व गोड असतात. या जातीच्या एका डाळिंबाचे सरासरी वजन 300 ग्रॅमपर्यंत असते.

केशर प्रकार- या जातीची फळे मोठ्या आकाराची व केशर रंगाची गुळगुळीत आणि चकचकीत असतात. बिया मऊ असतात. हे वाण राजस्थान आणि महाराष्ट्रासाठी अतिशय योग्य मानले जाते.

आरक्ता वाण – हा एक चांगला उत्पन्न देणारा प्रकार आहे. याची फळे मोठ्या आकाराची, गोड व मऊ बियांची असतात. सालीचा रंग आकर्षक असा लाल असतो.

कंधारी वाण – याचे फळ मोठे व अधिक रसाळ असते, परंतु बिया थोड्या कडक असतात.

अशी करा डाळिंबाची लागवड..

डाळिंब ही उपोष्णकटिबंधीय हवामानात वाढणारी वनस्पती आहे. डाळिंबाच्या फळाला वाढण्यासाठी व फळ धारणेसाठी उष्ण व कोरडे हवामान आवश्यक असते. जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या जमिनीत याची लागवड करता येते. पाण्याचा निचरा होणारी जमीन यासाठी सर्वात योग्य मानली जाते. नैसर्गिक खताचा वापर करून शेतकरी पडीक जमिनीतही डाळिंबाची लागवडही करू शकतात. डाळिंबाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी केवळ शेतकऱ्यांनी प्रगत वाणांची निवड करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये डाळिंबाचे ‘गणेश’ वाण बऱ्यापैकी वापरले जाते. या जातीची फळे मध्यम आकाराची असून बिया मऊ व गुलाबी रंगाच्या असतात.

असे करा डाळिंब बागेचे व्यवस्थापन

अधिकतर प्रमाणात रोपे लागवड करुनच डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. लागवड करण्याची योग्य वेळ ही ऑगस्ट ते सप्टेंबर किंवा फेब्रुवारी ते मार्च दरम्यान असते. रोप लागवड करताना 5 बाय 5 मीटर किंवा 6 मीटर अंतर ठेवावे लागते. शेतकरी बागायती शेतीचा अवलंब करत असतील तर बाग लागवड करताना 5 ते 3 मीटर अंतर ठीक आहे. पाणी व्यवस्थापनही अगदी सोपे आणि शेतकऱ्यांना सहजसोपे आहे. मे महिन्यापासून सिंचनाचे काम सुरु करावे लागते ते पावसाळा येईपर्यंत हे सुरू ठेवावे लागते. पावसाने उघडीप दिल्यास 10 ते 12 दिवसांच्या अंतराने सिंचन करता येते. राजस्थानसारख्या कमी पाण्यातील भागात हे तंत्रज्ञान उत्तम ठरू शकते, कारण त्यामुळे 43 टक्के पाण्याची बचत होते आणि उत्पादनात 30 ते 35 टक्के वाढ होते.

संबंधित बातम्या :

सावरा अन्यथा सरकार ढासळेल, राजू शेट्टींच्या पत्रात दडलंय काय ?

गाळपाअभावी शिल्लक ऊसाला जबाबदार कोण..! साखर आयुक्तांच्या पत्रामुळे लागणार का प्रश्न मार्गी?

Latur Market : शेतीमालाची आवक वाढली, दराचे काय..? रब्बीतील एका पिकानेच बदलले चित्र..!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.