मुंबई एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण, बटाटा आणि लसूणही गडगडला, वाचा आजचे दर

मुंबई बाजार समितीमध्ये कांदा, बटाटा आणि लसूण दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. Mumbai APMC Onion Rates

मुंबई एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण, बटाटा आणि लसूणही गडगडला, वाचा आजचे दर
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 4:57 PM

नवी मुंबई: आशियातील सर्वात मोठी बाजार समिती मुंबई बाजार समितीमध्ये कांद्यांच्या दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये सोमवारी 256 गाड्यांची आवक झाली. तीस हजार गोणी कांदा  घाऊक बाजारात आला आहे त्यामुळे कांद्याचे दर गडगडले. (Mumbai APMC Onion, Potato and Garlic rates down and alphonso supply increased)

गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर कांदा आवक

राज्यासह गुजरातमधील कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात आला आहे. कांद्याची आवक वाढल्याने बाजारभावात घसरण पाहायला मिळाली. आज मार्केटमध्ये नाशिक आणि पुण्यातील कांदा 5 ते 15 रुपये प्रति किलो तर गुजरात कांदा 5 ते 10 रुपये प्रति किलो विकला जात आहे. बाजारात गुजरात कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कांद्यासह बटाटा आणि लसूणही गडगडला

कांद्यासह बटाटा आणि लसणाचे ही दर कमी झाले आहेत. तीस हजाराहून अधिक गोणी बटाट्याची आवक आज मार्केटमध्ये झाली असून 6 ते 10 रुपये प्रतिकिलो बटाटा विकला जात आहे. तर जवळपास सात हजार लसूण गोणीची आवाक बाजारात असून 25 ते 65 रुपये प्रतिकिलो दराने लसणाची विक्री होत आहे.

फळ मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ मार्केटमध्ये आंब्याची बंपर आवक झाली असून दरात घसरण झाली आहे. तर, लवकरच आंबा सामान्यांच्या आवाक्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फळ मार्केटमध्ये आज 500 गाड्यांची आवाक झाली असून जवळपास तीस हजार पेटी आंबा मार्केटमध्ये आला आहे. रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याची आज जवळपास तेवीस हजार पेटी बाजारात आली आहे. तर, सहा हजार क्रेट कर्नाटक आणि केरळ आंबा बाजारात आला आहे. मागील आठवड्यापेक्षा केरळ आणि कर्नाटक आंब्याची आवक घटली असून हापूस आंबा आवक मात्र सहा हजार पेटीने वाढली आहे.

संबंधित बातम्या:

(Mumbai APMC Onion, Potato and Garlic rates down and alphonso supply increased)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.