Rabi Season: कडधान्याचे पीक गतवर्षी साधले यंदा नेमके काय झाले? पीक पध्दतीमध्ये बदल करुनही निराशाच
रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये मोठा बदल केला होता. पारंपरिक पिकांतून उत्पन्नात वाढ होत नाही म्हणून कडधान्यावर भर दिला होता. केवळ महाराष्ट्रातच नाही तर सर्वत्र अशीच परस्थिती आहे. पावसामुळे पेरण्या लांबल्या आणि याचाच फायदा घेण्यासाठी कडधान्यावर भर दिला होता. या दरम्यान, मोहरीच्या क्षेत्रातही मोठी वाढ झालेली आहे. सध्या या पिकाची काढणी कामे सुरु आहेत पण आवक वाढल्याने दरात मोठी घसरण होत आहे.
मुंबई : रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये मोठा बदल केला होता. (Traditional Crop) पारंपरिक पिकांतून उत्पन्नात वाढ होत नाही म्हणून कडधान्यावर भर दिला होता. केवळ महाराष्ट्रातच नाही तर सर्वत्र अशीच परस्थिती आहे. पावसामुळे पेरण्या लांबल्या आणि याचाच फायदा घेण्यासाठी (Cereals) कडधान्यावर भर दिला होता. या दरम्यान, (Mustard area) मोहरीच्या क्षेत्रातही मोठी वाढ झालेली आहे. सध्या या पिकाची काढणी कामे सुरु आहेत पण आवक वाढल्याने दरात मोठी घसरण होत आहे. गतवर्षी मोहरी पिकातूनच राजस्थान, हरियाणा, पंजाब येथील शेतकऱ्यांनी यामधून बक्कळ पैसा कमावला होता. गतवर्षी प्रमाणेच यंदाही स्थिती राहिल या अपेक्षांनी क्षेत्र वाढले पण मागणीपेक्षा आवक अधिकची होत असल्याने दरात घसरण झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला नवीन मालाला चांगला दर मिळाला होता. पण आवकचे प्रमाण अधिक झाल्याने टित्र बदलले आहे.
हमीभावापेक्षाही अधिकचा दर
मोहरीचे दर कमी झाले असले तरी ते हमीभावापेक्षा जास्तीचे आहेत. पण उत्पादन आणि ज्या उद्देशाने शेतकऱ्यांनी पेरणी केली होती तो उद्देश साध्य होताना दिसत नाही. सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर मोहरीचा पेरा झाला. तरी गतवर्षीपेक्षा हमीभाव 400 रुपायंनी वाढवला आहे. असे असतानाही उत्पादनावर झालेला खर्च आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा यांचा कुठेही ताळमेळ नाही. केंद्र सरकारने यंदाच्या हंगामासाठी मोहरीची एमएसपी ५,०५० रुपये प्रतिक्विंटल निश्चित केली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 400 रुपयांनी अधिक आहे.
उत्तर भारतामध्ये अधिकचे उत्पादन
बाजार समित्यांमध्ये मोहरीची आवक वाढल्याने दर हे घसरलेले आहेत. शिवाय याचा तेलबियांवरही परिणाम झालेला आहे. मोहरीचे उत्पादन अधिकत्तर उत्तर भारतामध्ये घेतले जाते. तर महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये सोयाबीनचे, सूर्यफूलसारख्या तेलांचा वापर अधिक केला जात आहे. त्यामुळे देशात तेलबियांचे उत्पादन वाढवण्यावर सरकारला प्रामुख्याने भर द्यावा लागणार आहे.\
निर्यातीसाठीच्या यंत्रणेतही महागाई
खाद्यतेलांच्या निर्यातीसाठी क्राफ्ट पुठ्यापासून बनवलेल्या पॅकचा वापर अधिक केला जातो आणि गेल्या वर्षभरात या पुठ्ठ्याची किंमत ही जवळपास दुप्पट झाली आहे. ती महाग असल्याने खाद्यतेलांव्यतिरिक्त इतर वस्तूंच्या किमती वाढतात. खाद्यतेलांच्या किमती सरकारला कमी करायच्या असतील तर इतर महाग करणाऱ्या प्रत्येक बाबीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. मागणी घटल्याने बिनोलामध्ये घट झाली तर किरकोळ व्यापारात शेंगदाणा तेलबिया, सोयाबीन इंदूर, सोयाबीन डेगम, सीपीओ आणि पामोलिन तेलांचे दर मागील स्तरावर बंद झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
संबंधित बातम्या:
Sugar production: साखर उत्पादनात महाराष्ट्राचीच बाजी, यंदा हंगाम लांबणीवर, काय आहेत कारणे?
Rabi Crop: अखेर शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली, शेतीमालाला योग्य दर अन् आवक वाढली तरी चिंता नाही?
मराठवाड्यातही कृषी पंपाचा वीज प्रश्न पेटला, शेतकऱ्यांना मिळणार का नियमित वीज?