Chickpea Crop : ‘नाफेड’ची यंत्रणा अपूरी, जागेअभावी हरभरा खरेदी केंद्रावरच पडून

यंदा शेतकरी हे खरेदी केंद्राचा आधार घेऊ लागले आहेत. खरेदी केंद्र आणि खुल्या बाजारपेठेतील दर यामध्ये मोठी तफावत असल्याने केंद्रावरच हरभऱ्याची विक्री केली जात आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये गतआठवड्यापर्यंत 1 लाख 76 हजार 839 क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली होती. यापैकी 1 लाख 40 हजार क्विंटल हरभरा हा वखार महामंडळाच्या गोदामात आहे. मात्र, शासकीय गोदामामध्ये जागा अपुरी पडत असल्याने आता खरेदी केंद्रावरच साठवणूक केली जात आहे.

Chickpea Crop : 'नाफेड'ची यंत्रणा अपूरी, जागेअभावी हरभरा खरेदी केंद्रावरच पडून
खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याचे दर घसरले असल्याने शेतकरी आता खरेदी केंद्राचा आधार घेत आहेत.
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 11:04 AM

परभणी : आतापर्यंत (NAFED) ‘नाफेड’ च्या खरेदी केंद्रावर शेतीमाल विकण्याची शेतकऱ्यांची मानसिकताच नव्हती. पण खुल्या बाजारपेठेतील आणि खरेदी केंद्रावरील हरभऱ्याच्या दरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांनी (Shopping Center) खरेदी केंद्राचाच आधार घेतल्याचे चित्र परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील खरेदी केंद्राची अवस्था पाहून येत आहे. कारण  (Corporation’s warehouse) महामंडळाच्या गोदामात शेतीमाल साठवण्यासाठी जागाच नसल्याने खरेदी केंद्राच्या बाहेरच हरभरा साठवला जात आहे. या दोन्ही जिल्ह्यातील 16 खरेदी केंद्रावर 36 हजार 556 क्विंटल हरभरा पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे चुकारे देण्यासही अडचणी निर्माण होत आहेत.

खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा कल

यंदा शेतकरी हे खरेदी केंद्राचा आधार घेऊ लागले आहेत. खरेदी केंद्र आणि खुल्या बाजारपेठेतील दर यामध्ये मोठी तफावत असल्याने केंद्रावरच हरभऱ्याची विक्री केली जात आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये गतआठवड्यापर्यंत 1 लाख 76 हजार 839 क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली होती. यापैकी 1 लाख 40 हजार क्विंटल हरभरा हा वखार महामंडळाच्या गोदामात आहे. मात्र, शासकीय गोदामामध्ये जागा अपुरी पडत असल्याने आता खरेदी केंद्रावरच साठवणूक केली जात आहे. यामुळे नुकासनीचा धोका तर आहेच पण खरेदी नंतरची प्रक्रिया होत नसल्याने चुकारे काढण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

दरामध्ये मोठी तफावत

हंगामाच्या सुरवातीपासूनच नाफेड ने उभारलेल्या खरेदी केंद्रावर खुल्या बाजारपेठेपेक्षा अधिकचे दर आहेत. मात्र, यामधील तफावत ही कमी होती त्यामुळे शेतकरी खुल्या बाजारपेठेतच विक्री करुन रोख रक्कम घ्यायचे. मात्र, आता खुल्या बाजारपेठेतील दर घसरले आहेत. क्विंटलमागे 800 ते 900 रुपयांचा फरक असल्याने शेतकरी आता खरेदी केंद्राचा आधार घेत आहेत. परिणामी गेल्या काही दिवसांपासून पुन्हा खरेदी केंद्रावरील आवक ही वाढली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हमीभाव केंद्राचा लाभ हरभरा उत्पादकांना यंदा झालेला आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांचे चुकारे देण्यासही अडथळे

खरेदी केंद्रावर खरेदी केलेला हरभरा वखार महामंडळाच्या गोदामात साठवणल्यावरच शेतकऱ्यांना चुकारे अदा करता येतात अन्यथा नाही. त्यामुळे गोदामातील शेतीमाल नाफेडकडे पाठवण्याची आवश्यकता आहे. शिवाय हरभरा खरेदीसाठी बारदाणाही कमी पडत आहे. खरेदीसाठी अडथळे निर्माण होत असल्याने अनेक वेळा खरेदीही बंद राहत आहे.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.