Weather Alert: महाराष्ट्रात येत्या 48 तासात विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज

पुढच्या दोन दिवसांमध्ये  विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather Alert)

Weather Alert: महाराष्ट्रात येत्या 48 तासात विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज
अतिवृष्टीचा इशारा
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 12:38 PM

मुंबई: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये  विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर हवामान विभागानं विदर्भातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावू शकतो. सांयकाळी आणि रात्रीच्या वेळी पाऊस विजांच्या कडकडाटासह हजेरी लावण्याची शक्यता आहे. (Nagpur IMD alerts Thunderstorms with lightning and rain in Vidarbha )

महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार?

प्रादेशिक हवामान केंद्र , नागपूरच्या अंदाजानुसार 14 आणि 15 एप्रिलला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती , यवतमाळ भंडारा वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. यवतमाळ, वाशिमध्ये 16 एप्रिलला विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नागपूर हवामान विभागाचं ट्विट

मुंबई वेदर या ट्विटर अकाऊंटवरुनही पावसाचा अंदाज

मंगळवारी राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

मंगळवारी दुपारनंतर महाराष्ट्राच्या कोल्हापूर, हिगोली, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली. कोल्हापुरात अनेक भागात कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु झाला. अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत झाला. भुदरगड तालुक्यातील तांबाळे इथं वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले तसेच हायस्कूलच्या इमारतीचेही मोठं नुकसान झालं. हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसानं हळद उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. अहमदनगर शहरासह ग्रामिण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाने कांद्याच नुकसान होणार आहे.

सोलापूरमध्ये द्राक्ष बागांचं नुकसान

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाच्या संकटाबरोबर जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतामध्ये असलेल्या पिकांचे झाली माती. ग्रामीण भागात द्राक्ष, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ज्वारी, गहू ,कडबा यांचे अतोनात नुकसान झालं आहे. तर, काही ठिकाणी बेदाणा शेड उडून गेल्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे.

संबंधित बातम्या:

कसा असेल यावर्षीचा मान्सून, पाऊसकाळ? स्कायमेटचा हा अंदाज वाचा

Weather Alert: पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाड्यासाठी पुढचे तीन तास महत्वाचे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

(Nagpur IMD alerts Thunderstorms with lightning and rain in Vidarbha)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.