Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाणी कमी असलं म्हणून काय झालं, शेतकरी किसन भोसलेंचा ‘हा’ प्रयोग देऊ शकतो लाखोंचा नफा

नांदेडमधील वाघी य़ेथील किसन भोसले या शेतकऱ्यानेही असाच फुलशेतीचा धाडसी निर्णय घेऊन भरगोस नफा मिळवण्याची कमाल करुन दाखवली आहे. (Nanded Nishigandha flower farming)

पाणी कमी असलं म्हणून काय झालं, शेतकरी किसन भोसलेंचा 'हा' प्रयोग देऊ शकतो लाखोंचा नफा
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 10:12 AM

नांदेड : नवीन तंत्रज्ञान आणि कल्पकतेच्या जोरावर आज कित्येक शेतकरी कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. नांदेडमधील वाघी य़ेथील किसन भोसले या शेतकऱ्यानेही असाच फुलशेतीचा धाडसी निर्णय घेऊन भरगोस नफा मिळवण्याची कमाल केली आहे. त्यांनी आपल्या शेतात निशिगंध फुलवलं आहे. निशिगंधाची शेती करुन त्यांनी मराठवाड्यासाऱख्या दुष्काळी पट्ट्यातही कमी खर्चात किफायतशीर शेती करता येऊ शकते याचं उदाहरण घालून दिलं आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगाची सध्या महाराष्ट्रात चांगलीच चर्चा आहे. (Nanded farmer did the successful Nishigandha flower farming)

प्रयोग म्हणून फुलवला निशिगंध

नांदेड हा मराठवाड्यातील दुष्काळी भागात मोडणारा जिल्हा आहे. पर्जन्यमान कमी असल्यामुळे येथे कमी पाण्यावर तग धरु शकणारी पिकं घ्यावी लागतात. वाघी येथील किसन भोसले यांच्याकडे एकूण 10 गुंठे शेती आहे. या शेतात कमी खर्च, कमी पाण्यावर कोणते पीक पिकवू शकतो याचा ते विचार करत होते. याचवेळी त्यांना फुलशेतीचा पर्याय योग्य वाटला. त्यासाठी त्यांनी वेगवेगळी माहिती जमवणे सुरु केले. सखोल अभ्यासानंतर त्यांनी प्रयोग म्हणून शेतात निशिगंधाची शेती करण्याचं ठरवलं. त्यांनी आपल्या 10 गुंठे जमिनीत निशिगंध फुलाची लागवड केली. पाण्याचे योग्य व्यवस्थापन, शेतीचा शास्त्रीय अभ्यास या सर्व गोष्टीमुळे त्यांनी हा प्रयत्न यशस्वी करुन दाखवला. त्यांच्या या प्रयत्नातून भोसले यांना 10 गुंठे शेतीतून वर्षाला साधरणत: 70 ते 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

योग्य व्यवस्थापनाने सर्व शक्य

यावेळी त्यांच्या या यशस्वी प्रयोगाबद्दल बोलताना योग्य व्यवस्थापन केल्याने हे सर्व शक्य झाल्याचे सांगितले. निशिगंध या फुलाला कमी खर्च लागतो. तसेच व्यवस्थापनासाठी खर्चही कमी येतो. तसेच, काही बुरशीनाशक फवारणीचा खर्च वगळता अन्य कोणताही अतिरिक्त खर्च त्याला लागत नसल्याचे भोसले सांगतात. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता आहे. मात्र, व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर काहितरी वेगळं करण्याची इच्छा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निशिगंधाची शेती करण्याचा योग्य पर्याय असल्याचे भोसले सांगतात.

साताऱ्यातही गोमुत्र, शेणखताचा वापर करुन फुलशेती

शेतात निशिगंध फुलवण्याचा महाराष्ट्रातील हा काही पहिलाच प्रयोग नाही. साताऱ्यातील श्रीकांत नलावडे यांनी दोन वर्षांपूर्वी निशिगंधाची शेती करण्याचा प्रयोग केला होता. यावेळी आपल्या 30 गुंठे शेतात त्यांनी निशिगंध लावला होता. या शेतीमध्ये त्यांना भरगोस नफाही मिळाला होता. शास्त्रीय नियोजन करुन त्यांनी ही फुलशेती केली होती. त्यासाठी त्यांनी गोमुत्र, शेणखत, ठिबक सिंचनाचा खुबीने वापर केला होता. निशिगंधाची लागवड करण्यापूर्वी नागरणी करताना त्यांनी शेतात शेणखत मिसळला होता. त्यांनतर चार फुटांचे बेट उभारत त्यावर सव्वा फुटांच्या अंतरात त्यांनी निशिगंध फुलाची लागवड केली होती. पाण्याची कमतरता असल्यामुळे नलावडे यांनी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचे योग्य नियोजन करत शेतात निशिगंधाची शेती केली होती. त्यांच्याही या प्रयोगाची तेव्हा चांगलीच चर्चा झाली होती.

दरम्यान, नांदेडमधील किसन भोसलेंच्या या प्रयोगमुळे मराठवाड्यासाऱख्या भागात तसेच, पाणी कमी असलेल्या भागामध्ये निशिगंध लागवडीसारखे काही वेगळे प्रयोग करुन चांगला नफा मिळवता येऊ शकतो, असे म्हटले जाऊ लागले आहे.

संबंधित बातम्या :

Special Story | नंदूरबारच्या अविनाश पाटलांनी करुन दाखवलं, मिरची शेतीतून 5 महिन्यात कमावले 12 लाख

Special Story | Dragon Fruit चं गुजरातमध्ये नामकरण, महाराष्ट्रातील ड्रॅगन फ्रुट शेतीची स्थिती काय?

आनंदाची बातमी! शेतीसाठी सरकार देतंय 50 हजार रुपये; जाणून घ्या, PKVY योजनेबद्दल सर्व काही

(Nanded farmer did the successful Nishigandha flower farming)

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.