Desi Jugaad : एक लिटर डिझेलच्या इंधनात दोन एकर क्षेत्रातील कोळपणी, देशी जुगाड पाहायला शेतकऱ्यांची गर्दी
Nanded Farmer Jugaad : प्रत्येकवेळी शेतकरी आपलं काम सोप्पं करण्यासाठी देशी जुगाड करीत असतात. सध्या एका शेतकऱ्याने ट्रॅक्टरला कोळपणी यंत्र जोडलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा अधिक वेळ वाचत असल्याचं ते सांगत आहेत.
नांदेड : शेतीच्या कामासाठी लोकांनी तयार केलेले जुगाड लोकांना अधिक आवडतात. कारण केलेल्या जुगाडामुळे शेतकऱ्याचा (Nanded Farmer Jugaad) अधिक वेळ वाचतो. त्याचबरोबर शेतीचं काम सुध्दा वेळेत होतं असं अनेकदा पाहायला मिळालं आहे. शेतीच्या कामासाठी तयार केलेले जुगाड सोशल मीडियावर अधिक व्हायरल (viral news) सुध्दा झाले आहेत. शेतीच्या कामाच्या अनुशंगाने आतापर्यंत अनेक तरुणांनी अशा पद्धतीचे अनेक जुगाड यंत्र तयार केली आहेत. नांदेडच्या शेतकऱ्याने सुध्दा असाच एक जुगाड तयार केला आहे. विशेष म्हणजे त्या शेतकऱ्याचा जुगाड (Desi Jugaad) पाहायला शेतकरी अधिक गर्दी करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
नांदेडच्या बिलोली तालुक्यातील हुनगुंदा येथील जीवन पाटील या शेतकऱ्याने देशी जुगाड तयार केलं आहे. ट्रॅक्टरला कोळपणी यंत्र जोडलं आहे. अवघ्या एक लिटर डिझेलच्या इंधनातून दोन एकर क्षेत्रातील कोळपणी होत असल्याचं जीवन पाटील शेतकरी सांगत आहेत. वेळेसह श्रमाची बचत करणारे हे देशी जुगाड लोकांच्या अधिक पसंतीला पडलं आहे. त्यामुळे रोज हा जुगाड पाहायला शेतकरी गर्दी करीत आहेत.
शेतीच्या एखाद्या कामासाठी शेतकरी युट्यूब आणि इतर माध्यमातून प्रत्येकवेळी जुगाड करण्याचा प्रयत्न करीत असतो. अनेक तरुणांना प्रयोग करण्यात यश आलं आहे. तर काहीजण रोजनव्याने प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तरुण शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करीत आहे. त्याचबरोबर त्यातून चांगले पैसे सुध्दा कमावत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून अनेकांनी गाई आणि म्हैशीचं पालन केलं आहे. त्यामुळे शेती जरी नुकसान झालं, तरी दुसऱ्या व्यवसायामुळे अधिकचा ताण येत नाही असं तरुण शेतकरी सांगत आहेत.