Smart Farmer: नांदेडच्या शेतकऱ्यांना कळाले योजनेचे महत्व, एका महिन्यात कोट्यावधींचा विजबिल भरणा, जाणून घ्या काय आहे योजना?
'ई-पीक पाहणी' मोहिमेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पहिला क्रमांक पटकाविला होता. शिवाय पिक विमा योजनेतही नांदेड जिल्ह्यातील शेतकरीच आघाडीवर होते आता महावितण कंपनीकडून सुरु असलेल्या महाकृषी ऊर्जा योजनेचे महत्व या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच पटले असून 1 महिन्याच्या कालावधीमध्ये 4 कोटी 50 लाखाचे विजबिल शेतकऱ्यांनी अदा केले आहे. त्यामुळे महावितणचा वसुलीचा उद्देशही साध्य झाला असून शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला आहे.
नांदेड : सरकारी योजनेची लाभ घेण्यात मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नांदेड जिल्हा हा आघाडीवर राहिलेला आहे. यापूर्वी ‘ई-पीक पाहणी’ मोहिमेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पहिला क्रमांक पटकाविला होता. शिवाय पिक विमा योजनेतही नांदेड जिल्ह्यातील शेतकरीच आघाडीवर होते आता महावितण कंपनीकडून सुरु असलेल्या महाकृषी ऊर्जा योजनेचे महत्व या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच पटले असून 1 महिन्याच्या कालावधीमध्ये 4 कोटी 50 लाखाचे विजबिल शेतकऱ्यांनी अदा केले आहे. त्यामुळे महावितणचा वसुलीचा उद्देशही साध्य झाला असून शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला आहे.
काय आहे महाकृषी ऊर्जा अभियान?
कृषी वीज बिलातून शेतकऱ्यांना थकबाकी मुक्त करण्यासाठी महावितरणकडून राबवण्यात येणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानास संपूर्ण राज्यभरातून चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार थकबाकी मुक्त योजनेत आठ लाख सहा हजार 104 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. शेतकऱ्यांनी मूळ थकबाकी पैकी 50 टक्के रकमेचा भरणा करून शंभर टक्के थकबाकी मुक्ती व्हायचे आहे. एवढेच नाही तर पुन्हा थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना चालू बिलामध्येही सवलत मिळणार आहे.
वसुलीसाठी महावितरण कंपनीचे अभियान
विज ही अत्यावश्यक असली तरी आजही विजबील भरणाबाबत कमालीची उदासिनता आहे. कारण सर्वात जास्त थकबाकी ही कृषीपंप धारकांकडे आहे. त्यामुळे वेगवेगळ्या योजना राबवून ही थकबाकी कमी करण्याचा प्रयत्न हा महावितरण कंपनीकडून केला जातो. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावरच असे उपक्रम राबविले जातात. कारण रब्बी हंगामातील पिकांच्या भरण्याकरिता शेतकऱ्यांना विजेची आवश्यकता असते. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होई या धास्तीने विजबील अदा केले जातात.
नांदेड परीमंडळात तीन जिल्ह्यांचा समावेश
नांदेड परीमंडळात लगतच्या हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. या अभियाना दरम्यान जिल्ह्यात जनजागृती मेळावे घेण्यात आले. त्यात जवळपास 81 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये 390 कोटी रुपयांची माफी मिळालीय. तर थकबाकी आणि चालू विजबिलापोटी 44 कोटी 72 लाख रुपयांचे विजबिल शेतकऱ्यांनी भरलेत. या योजनेअंतर्गत 3 हजार शेतकरी शंभर टक्के थकबाकी मुक्त झालेत तर एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.