शेतात लावलेल्या केळीच्या बागेतील 500 झाडांची कत्तल, पोलिस म्हणतात…

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका बागायतदार शेतकऱ्यांचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी पपई या पिकांचे उत्पादन घेतले जाते.

शेतात लावलेल्या केळीच्या बागेतील 500 झाडांची कत्तल, पोलिस म्हणतात...
banana Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 11:16 AM

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : शहादा (shahada) तालुक्यात अज्ञात व्यक्तींकडून पिके कापून फेकण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पिंपरी शिवारात उद्धव पाटील या शेतकऱ्याच्या (farmer) केळीच्या बागेत ४०० ते ५०० केळीची झाडे अज्ञात माथेफिरुने कापून फेकल्याने चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या अज्ञात व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अचानक हा संतापजनक प्रकार घडल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संतप्त झाला आहे. त्याचबरोबर अशा लोकांवर तात्काळ कारवाई करण्याची तक्रार तिथल्या शेतकऱ्यांनी (nandurbar news) केली आहे.

वारंवार घटना घडत असल्यामुळे शेतकरी टेन्शनमध्ये

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका बागायतदार शेतकऱ्यांचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी पपई या पिकांचे उत्पादन घेतले जाते. गेल्या काही दिवसांपासून अज्ञात व्यक्ती शेतकऱ्यांच्या शेतातील केळी आणि पपईच्या बागांचे नुकसान करत असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. उद्धव पाटील यांच्या शेतात लावलेल्या केळीच्या बागेतील ४०० ते ५०० झाडांची कत्तल अज्ञात व्यक्तीने केल्याने त्यांना मोठा आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. उद्धव पाटील यांनी शहादा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून अज्ञात व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. अज्ञात व्यक्तीने केलेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनी देत नसल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिके कापून फेकण्याचा घटनांमध्ये वाढ झाली असून संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर कोठार कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आतापर्यंत अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक

नंदूरबार जिल्ह्यातील पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा अपात्र लाभार्थीने लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर महसूल यंत्रणेद्वारे खातेदारांची शेतीविषयक माहिती भरण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक असतानाही जिल्ह्यात अजूनही २० हजार ९०४ शेतकन्यांनी अद्यापपर्यंत ई-केवायसीची पूर्तता झालेली नाही

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.