नंदुरबारकडं पावसाची पाठ, बँकांनीही पीक कर्जासाठी हात आखडला, पेरण्या खोळंबल्या
जुलै महिना संपत आला तरी नंदूरबार जिल्ह्यात सरासरीच्या आवघा 30 टक्के पाऊस झालाय.जिल्ह्यातील आवघ्या 39 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असली तरी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या समोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
नंदुरबार: राज्यासह कोकण मुंबई नवी मुंबई या भागात पावसाने कहर केला आहे. मात्र, नंदुरबार जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रमध्ये पावसाने दडी मारल्याने जुलै महिना संपत आला तरी नंदूरबार जिल्ह्यात सरासरीच्या आवघा 30 टक्के पाऊस झालाय.जिल्ह्यातील आवघ्या 39 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असली तरी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या समोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
1 लाख हेक्टरवर पेरणी
यंदांच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण 3 लाख 5 हजार हेक्टर क्षेत्र पेरणी चे उदिष्ट कृषी विभागाच्या वतीने ठेवण्यात आले होते. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून पासून पावसाने हुलकावणी दिल्याने पेरण्यांना ब्रेक लागला आहे. आता पर्यंत 1 लाख 11 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असली तरी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट आहे. आता तरी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील पीकपाणी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी प्रशासनाची तातडीची बैठक बोलवली आहे. जिल्ह्यातील परिस्थिती आढावा घेऊन मंत्रिमंडळ समोर ठेऊन शेतकऱ्यांना जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन पालकमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांनी दिले आहे.
बँकाकडून पीक कर्ज देण्यात आखडता हात
जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत असताना बँकांनी पीक कर्ज हात आखडता घेतला आहे. नंदुरबारमध्ये 1 लाख 66 हजार खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी आवघ्या 19 हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले आहे. दुबार पेरणीचे संकट असल्याने ग्रामीण भागात पीक कर्ज मेळावे घेणार असल्याचे खासदार डॉ. हीना गावित यांनी सांगितले.
दीड महिना उलटून ही समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी कमी दिवसात आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड करावी असे आवाहन निलेश भागेश्वर जिल्हा कृषी अधिकारी यांनी केलंय.
जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवाल दिल असला तरी प्रशासनाच्या कडून कुठल्याही प्रकारची हालचाल होत नाही आहे. आता शेतकऱ्यांनी नको देऊ सोन्याचांदीचे दान भिजव माझे रान, असा विठूराया चरणी धावा शेतकऱ्यांनी सुरु केला आहे.
इतर बातम्या
Nandurbar cultivation lack of rain and banks not provide crop loan to farmers in sufficient manner