या जिल्ह्यात मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत, खरीप हंगामात….
धुळे जिल्ह्यात यावर्षी कपाशीची लागवड करण्यासाठी आता शेतकरी बियाणांच्या दुकानात गर्दी करू लागला आहे. दमदार मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : नंदुरबार (nandurbar) जिल्ह्यात खरीप हंगामाची (kharip season) तयारी सुरू झाली आहे. मात्र जिल्ह्यातील मजूर कामाच्या शोधात स्थलांतर झाल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामात लागवड करण्यासाठी मजूर मिळत नसल्याचं शेतकरी सांगत आहेत. मजूर इतरत्र स्थलांतर झाल्यामुळे. नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामासाठी एक दोन लाख ८८ हजार ४६५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक कापसाची आणि सोयाबीनची लागवड होत असते त्यासाठी मजुरांची मोठी गरज लागणार आहे. परंतु जिल्ह्यात मजूर नसल्याने शेतकऱ्यांना (agricultural news in marathi) आता नवीन समस्याला तोंड द्यावा लागणार आहे.
धुळे जिल्ह्यात यावर्षी कपाशीची लागवड करण्यासाठी आता शेतकरी बियाणांच्या दुकानात गर्दी करू लागला आहे. दमदार मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी बियाणांच्या दुकानावर गर्दी करू लागले आहेत. यंदा जिल्ह्यात 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात कापूस कागव होणार आहे. गेल्या वर्षाचा कापसाला चांगला भाव मिळाला नसल्याने अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडलेला आहे. असे असले तरी याही वर्षी शेतकरी कापूस लागवडीकडे झुकल्याचे चित्र आहे. यावर्षी तरी सरकारने कपाशीला चांगला भाव द्यावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामापूर्वीची मशागत पुर्ण केली आहे. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी भात पेरणी केली आहे, असे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. मागच्यावर्षी पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली होती, त्यावेळी भाताच्या शेतीचं मोठं नुकसान झालं होतं.