शेतकऱ्याने भंगारातून बनवला 55 फूटाचा बूम स्प्रे, 20 मिनिटात करतो दहा एकरात फवारणी

गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते. हे कमलेश याने तयार केलेल्या मशीनपाहून हे खरंच असल्याचे पटते, एकीकडे ग्रामीण भागात प्रचंड बुद्धीमत्ता असलेले तरुण आहेत मात्र त्यांच्या कला गुणांना चालना देण्यासाठी सरकारने पुढे येण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे.

शेतकऱ्याने भंगारातून  बनवला 55 फूटाचा बूम स्प्रे, 20 मिनिटात करतो दहा एकरात फवारणी
Nandurbar farmer builds 55-foot boom spray from scrap
Follow us
| Updated on: Sep 12, 2024 | 7:36 PM

नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील 33 वर्षीय युवक कमलेश अशोक चौधरी हा खाजगी कंपनीत काम करीत असतात वडिलांच्या आजारामुळे नोकरी सोडून 5 वर्षापूर्वी गावाकडे परतला. वडिलांच्या निधनानंतर त्यांची दहा एकर शेती तो करू लागला. कमलेश चौधरी चे शिक्षण कृषी पदवीधर पर्यंत झाले आहे. गावाबाहेर वैजाली रस्त्यावरील एका गोडाऊनमध्ये सर्व टाकाऊ वस्तू त्यानी संग्रह करून ठेवलेला आहे. दरवर्षी ते  युट्युबवर पाहून नवीन नवीन शेती अवजाराचा शोध लावत असतात आणि टाकाऊ पासून ते टिकाऊ तयार करण्याची त्यांना आवड आहे. गेल्यावर्षी कमलेशने २७ फूट लांबीचा बूम स्प्रे मॅन्युअली तयार केला होता. त्यातून त्याने १८५० एकरावर औषध फवारणी केली. यावर्षी चक्क हायड्रोलिक तोही ५५ फूट लांबीचा स्प्रे पंप तयार केला आहे. कमलेशने दोन महिन्यांत हा हायड्रोलिक बूम स्प्रे मशीन तयार केला आहे. हे मशिन वीस ते पंचवीस मिनिटांत दहा एकरची कीटकनाशक, तणनाशकाची फवारणी करते. कमलेशची ही कामगिरी पाहण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत.

कमलेश याने मशीनसाठी जुने ट्रॅक्टर साडेतीन लाखाला खरेदी केले होते, त्यासाठी पंजाब येथुन एक लाख 75 हजाराचे इजराइल बनावटीचे बुस्टनचे एअरलेस टायर मागवले. मागील दोन टायर सहा फूट उंचीचे तर पुढील दोन टायर साडे चार फूट उंचीचे आहेत. त्याला एक हजार लिटरची टाकी बसवली ज्याला खर्च ४५ हजार रुपये आला, ही टाकी ट्रॅक्टरच्या मधोमध बसविली आहे. त्यामुळे तोल साधला जाऊन टॅक्टर पुढून उचलले जाऊ नये याची काळजी घेतली गेली. टाकीतील औषधी फवारणीसाठी स्पीड पंप बसवला आहे. जो एका मिनिटाला 185 लिटर पाण्याच्या प्रेशर करतो. कीटकनाशक फवारणी करताना चालकाच्या अंगावर केमिकल येऊ नये म्हणून काचेची केबिन बनवली असून त्यात पंखा देखील बसवला आहे.हे सर्व मशिन कमलेश याने दोन महिन्यात तयार केले आहे.

वेळची आणि पैशाची  बचत

या मशीनचा फायदा असा आहे की, 55 फूट बूम स्प्रे केला जातो. दहा एकरला फक्त वीस ते पंचवीस मिनिटात फवारणी होते. या मशीनमुळे फवारणी करताना मजूर वर्गाला साप, विंचू अशा सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका पोहचत नाही. तसेच फवारणी करताना समप्रमाणात फवारणी केली जाते. या मशीनमुळे जादा मनुष्यबळ लागत नाही. वेळची आणि पैशाची देखील बचत होते असे कमलेश याने म्हटले आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.