नंदुरबारमध्ये पपई बागांवर डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांवर संकटांची मालिका सुरुच, परतीच्या पावसाचा कांद्यालाही फटका

अतिवृष्टी आणि संततधार पावसाचा फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. पपई बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला असून मोठ्या प्रमाणात पानगळ होऊन पपई चे फळे उघडी पडून खराब होत आहेत.

नंदुरबारमध्ये पपई बागांवर डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांवर संकटांची मालिका सुरुच, परतीच्या पावसाचा कांद्यालाही फटका
पपईचे दर निश्चित होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 12:46 PM

नंदुरबार: जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि संततधार पावसाचा फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. पपई बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला असून मोठ्या प्रमाणात पानगळ होऊन पपई चे फळे उघडी पडून खराब होत आहेत. एकूणच पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली असली तरीपण पपईच्या नुकसानीचे कुठलेही पंचनामे करण्यात आलेले नाहीत.

नंदुरबार जिल्ह्यात ,6400 हेक्टर क्षेत्रावर पपई पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी चार हजार हेक्टर क्षेत्र एकट्याचा शहादा तालुक्यात आहे. बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा मोठा प्रादुर्भाव पाहण्यास मिळत आहे. पपईच्या बागांमध्ये पाणी साचून असल्याने पपई बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्याचसोबत पपई बागांवर डवणी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पपई पिकावर मोठा परिणाम झाला आहे.

शेतकरी हैराण

पपईच्या झाडाची पाने पिवळी होऊन गळून पडत आहेत तर फळाच्या वाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळे त्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे नंदुरबार जिल्ह्यातील पपई बागा उध्वस्त होण्याच्या परिस्थितीत आहेत. कृषी विभागाच्या वतीने पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या परिसरात या रोगांच्या नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे प्रत्यक्षिक घ्यावीत, अशी मागणी शेतकर्‍यांच्या वतीने करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी गेल्या तीन-चार वर्षांपासून पपईवर पडणाऱ्या विविध रोगांमुळे हैराण झाले आहेत.

परतीच्या पावसानं कांद्याचंही नुकसान, दर भडकणार

परतीच्या पावसामुळे नवीन कांदा पिकाचे खूप नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत इतर राज्याच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमा केलेल्या जुन्या कांद्याची मागणी वाढत असून परिणाम म्हणून कांद्याचे भाव झपाट्याने वाढत आहेत. सध्या किरकोळ बाजारात कांद्याला 50 ते 60 रुपये मिळत आहे. नवीन कांदा तयार होण्यास आणखी थोडा वेळ लागणार आहे त्यामुळे कांद्याचे भावही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकात परतीच्या पावसानं कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंध्रप्रदेश, तमिळनाडू मध्यप्रदेश, गुजरात मध्ये परतीचा मान्सूनच्या पावसाने कहर केला आहे. पावसात नुकसान झालेल्या पिकामुळे शेतकर्‍यांना पुन्हा पेरणी करावी लागली, नवीन कांदा पीक नोव्हेंबर मध्ये तयार होणार आहे, त्या आधीच दिवाळी असल्यामुळे दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

इतर बातम्या

RAIL ROKO Andolan Today: लखीमपूर खेरी प्रकरणी शेतकरी आक्रमक, रेल्वे कुठं थांबवायची हे आम्हाला माहिती, राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा

जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानीची ऊस परिषद, राजू शेट्टी ऊसदर आंदोलनाचं रणशिंग फुंकणार

Nandurbar Farmers facing problems due to downy effect on Papaya demanded Government take action

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.