Red Chilly : नंदुरबारच्या बाजारपेठेत लाल मिरचीचा ‘ताल’, समितीच्या मैदानावरही वाहनांच्या रांगाच रांगा

ध्या सोयाबीन आणि कांदा दराची मोठ्या प्रमाणात चर्चा होत असली तरी नंदुरबारच्या बाजारपेठेत केवळ मिरचीची चर्चाच नाही तर येथील चित्रही वेगळेच आहे. संबंध बाजारपेठ लाल मिरचीने अच्छादलेली आहे. यंदा नैसर्गिक वातावरणामुळे सर्वकाही प्रतिकूल होत असले तरी नंदुरबारच्या बाजारपेठेतील लाल मिरचीचा ठसका काही औरच आहे.

Red Chilly : नंदुरबारच्या बाजारपेठेत लाल मिरचीचा 'ताल', समितीच्या मैदानावरही वाहनांच्या रांगाच रांगा
नंदुरबार बाजारपेठेत लाल मिरचीची आवक वाढली असून बाजार समितीच्या परिसरात अशा प्रकारे वाळवण केले जात आहे.
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 12:29 PM

नंदुरबार : सध्या सोयाबीन आणि कांदा दराची मोठ्या प्रमाणात चर्चा होत असली तरी नंदुरबारच्या बाजारपेठेत केवळ मिरचीची चर्चाच नाही तर येथील चित्रही वेगळेच आहे. संबंध बाजारपेठ ( Red chilly) लाल मिरचीने अच्छादलेली आहे. यंदा नैसर्गिक वातावरणामुळे सर्वकाही प्रतिकूल होत असले तरी (Nandurbar market) नंदुरबारच्या बाजारपेठेतील लाल मिरचीचा ठसका काही औरच आहे. दिवस उजाडताच बाजारपेठेत वाहनांच्या रांगा..व्यापाऱ्यांची रेलचेल आणि (record arrivals) वाढत्या आवकमुळे दराचे काय होणार याची धास्ती असलेले शेतकरी. गेल्या काही दिवसांपासून असेच वातावरण आहे. दोन दिवसांपासून तर लाल मिरचीची आवक वाढलेली आहे. त्यामुळे बाजारपेठेच्या जागेवर मिरची घेऊन येणाऱ्या वाहनांना उभे राहण्यासाठी जागा नसल्याने मिरची पथारी वर वाहने दिसून येत आहेत.

विक्रमी आवक, दरही समाधानकारक

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. दिवसेंदिवस येथील लागवड क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. तर या बाजारपेठेला अन्यनसाधारण महत्व असल्याने गुजरात आणि मध्यप्रदेश येथील शेतकरीही मिरची विक्रीसाठी नंदुरबारचीच बाजारपेठ जवळ करीत आहेत. आतापर्यंत तर विक्रमी आवक झालेली आहे. हंगामाची सुरवात झाल्यापासून शनिवार पर्यंत 7 हजार वाहनांतून मिरचीची आवक झाली आहे. बाजार समितीच्या माध्यमातून 1 लाख 25 हजार क्विंटलची खरेदी झाली आहे. शिवाय आवकमध्ये वाढतच आहे. त्यामुळे यंदा विक्रमी आवक होणार असल्याचे बाजार समितीचे सभापती यांनी सांगितले आहे.

आवक वाढल्यानंतर काय आहे दर…?

एकंदरीत शेतीमालाची आवक वाढली की, दर हे कमी होतात. पण लाल मिरचीच्या बाबतीत असे होताना दिसत नाही. आवक वाढूनही 4 हजार रुपये क्विंटलला दर मिळत आहे. मिरचीच्या दरातील वाढ ही कायम आहे. बाजारपेठेत दाखल होणाऱ्या वाहनांना उभे राहण्यासही जागा कमी पडत आहे. त्यामुळे मिरची पाथरीवरही वाहनांच्या रांगा आहेतच. शिवाय अजून महिनाभर जरी याप्रमाणेच आवक राहिली तरी दर कमी होणार नाहीत असेही व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कारण आवक त्याचप्रमाणात मागणी आहे. केवळ व्यापारीच नाही तर किरकोळ विक्रत्येही येथील बाजारपेठेत दाखळ होत आहेत.

मिरचीच्या पाथरीवरही वाहनांची पार्किंगच

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरची वाळवण्यासाठी जी विशेष सोय करण्यात आली त्याला पथारी असे म्हटले जात आहे. या ठिकाणी ओल्या मिरच्या ह्या वाळवल्या जातात. मात्र, आता मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने या ठिकाणी देखील वाहनांची पार्किंग केली जात आहे. तर येथील परिसरात मिरचीच पसरण दिसून येत आहे. दुसरीकडे हंगामी पिकांचे दर हे कमी होत आहेत. मात्र, भाजीपाल्यातील या मिरचीने नंदुरबार सह परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या :

काय सांगता ? महाराष्ट्र अग्रिमन अधिनिर्णय प्राधिकरणाच्या निर्णयामुळे शेतकरीही गेले चक्रावून, हळद म्हणे…

आंबा पाठोपाठ ‘या’ फळपिकाचाही हंगाम लांबणीवर, बागायतदारांना चिंता दराची

Milk Production | दुग्धोत्पादन वाढवाचंय, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदारांनी सांगितली युक्ती!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.