झेंडूचं फूल तोडल्यानं मारहाण, पपईची बाग कापून बदला, नंदुरबार पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
एका माथेफिरूने शेतातील झेंडूचे फूल तोडले, म्हणून शेतकऱ्याने मारहाण केली. संबंधित माथेफिरूनं त्याचा बदला म्हणून अन्य दोघांच्या साथीनं पपईची 629 झाडांची कत्तल केल्याचे उघडकीस आले आहे.
नंदुरबार: जिल्ह्यात कुठल्या ना कुठल्या प्रकाराने पीक कापून टाकण्याचे प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. एका माथेफिरूने शेतातील झेंडूचे फूल तोडले, म्हणून शेतकऱ्याने मारहाण केली. संबंधित माथेफिरूनं त्याचा बदला म्हणून अन्य दोघांच्या साथीनं पपईच्या 629 झाडांची कत्तल केल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि तळोदा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले असून तिसरा संशयित फरार झालाय.
तळोदा तालुक्यातील बोरद शिवारातील दत्तू पाटील यांच्या शेतातून राजू ठाकरे यांनी काही झेंडूची फुले तोडली होती. त्यातून पाटील यांनी राजू यास मारले होते. राजू ठाकरे यानं त्या गोष्टीचा राग मनात धरून मित्र रामलाल आणि बलम यांच्या सोबतीने 23 ऑगस्टच्या रात्री दत्तू पाटील यांच्या शेतातील पपईच्या बागेची कत्तल केली होती.
सातशे झाडांचे नुकसान
सातशे झाडांचे नुकसान झाले होते यानंतर पाटील यांनी तळोदा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. परिसरात मोठ्या प्रमाणात अशा घटना वारंवार घडत असल्याने पोलिसांच्या समोरही तपासाचे मोठे आव्हान होते. पोलिसांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोन संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांकडून आता तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे.
कधी घडली घटना?
दत्तू पाटील यांना तीन एकरात पपईची लागवड केली होती. 25 ऑगस्टला पाटील सकाळी मजुरांच्या सोबत शेतात गेले असता पपईची झाडांची धारदार शस्त्राचा सहाय्याने कत्तल करण्यात आल्याचे दिसून आले आहे. अगोदरच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताचे पाणी करुन जगवलेल्या पपईच्या बागा अज्ञात माथेफिरू कापून टाकल्यानं दत्तू पाटील यांना धक्का बसला होता.
शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान
किरकोळ कारणावरून पीक कापून फेकण्याच्या अनेक घटना नंदुरबार जिल्ह्यात घडत असून यातून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे पोलीस प्रशासनाने ही शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींची वेळेत शहानिशा झालीत या प्रकारांना आळा बसू शकतो
इतर बातम्या:
बैलगाडी शर्यत आणि सराव पूर्ववत सुरु करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढणार, सुनील केदार यांची माहिती
गोंदियात महिला शेतकऱ्याने फुलविली सेंद्रिय बागायती शेती, देशी-विदेशी भाजीपाला लागवड
Nandurbar Police arrest two Person for cutting Papaya tree at Borad Village of Taloda