रक्ताचं पाणी करुन जगवलेली पपईची बाग उद्धवस्त, पिके कापण्याच्या घटना वाढल्या, पोलिसांच्या कारवाईची गरज

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बोरद शिवारात तीन एकरात लागवड केलेली पपईची 1600 परिपक्व झाडे अज्ञात माथेफिरूने कापून घटना घडली आहे.

रक्ताचं पाणी करुन जगवलेली पपईची बाग उद्धवस्त, पिके कापण्याच्या घटना वाढल्या, पोलिसांच्या कारवाईची गरज
नंदुरबार पपई बाग
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 11:16 AM

नंदूरबार: जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बोरद शिवारात तीन एकरात लागवड केलेली पपईची 1600 परिपक्व झाडे अज्ञात माथेफिरूने कापून घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्याने एकच आक्रोश केला आहे. दहा दिवसांपूर्वी याच क्षेत्रातील पपईची 50 च्या जवळपास झाडे कापली गेली होती. त्यानंतर एकाच रात्री दोन एकरातील पावणेदोन हजार झाडे कापली गेली आहेत. अज्ञात माथेफिरूंच्या या कृतीमुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. याप्रकरणी तपास होऊन कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

रक्ताचं पाणी करुन जगवलेल्या बागेचं होत्याचं नव्हतं

दत्तू रोहिदास पाटील यांच्या बोरद शिवारातील शेतात सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. दत्तू पाटील यांना तीन एकरात पपईची लागवड केली आहे. सकाळी मजुरांच्या सोबत शेतात गेले असता पपईची झाडांची धारदार शस्त्राचा सहाय्याने कत्तल करण्यात आल्याचे दिसून आले आहे. अगोदरच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताचे पाणी करुन जगवलेल्या पपईच्या बागा अज्ञात माथेफिरू कापून टाकत असल्याने शेतकरी अडचणीत आलेत. पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय. मात्र, याकडे लक्ष दिलं जात नसल्याचेही समोर आले आहे.या भागात पिके कापून फेकण्याचा घटना मध्ये वाढ झाली असून माथेफिरू चा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 तापी नदी पात्रात मासेमारी साठी मोठी गर्दी

गेल्या आठवड्यात मध्यप्रदेश आणि जळगाव मध्ये दमदार पाऊस झाल्याने हातनूर धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेज मधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. आता प्रकाशा बॅरेज चे दरवाजे बंद करण्यात आल्याने नदीतील पाणी पातळी कमी झाल्याने मासेमारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी केली आहे. रोजगार नसल्याने स्थानिक तरुण मासेमारीकडे वळले असल्याचे चित्र सध्या तरी जिल्ह्यात दिसून येत आहे. मासेमारी तून थोड्याफार प्रमाणात रोजगार प्राप्त होत असल्याने तरुणांची गर्दी नदीपात्रात दिसून येत आहे.

इतर बातम्या:

बैलगाडी शर्यत आणि सराव पूर्ववत सुरु करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढणार, सुनील केदार यांची माहिती

गोंदियात महिला शेतकऱ्याने फुलविली सेंद्रिय बागायती शेती, देशी-विदेशी भाजीपाला लागवड

Nandurbar Taloda Village Borad  farmer Dattu Patil Papaya Farm demolished by Unknown person farmer demanded Probe

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.