डिजीटल मार्केटिंग सोडून तरुणाची मधुमक्षिका पालनाला सुरुवात, अवघ्या वर्षभरात लाखोंची कमाई

डिजीटल मार्केटिंग सोडून मधनिर्मिती व्यवसाय उतरलेल्या नरेश जांग यांनी 20 लाखांची उलाढाल केली आहे. (Naresh Jang bee keeping)

डिजीटल मार्केटिंग सोडून तरुणाची मधुमक्षिका पालनाला सुरुवात, अवघ्या वर्षभरात लाखोंची कमाई
मधुमक्षिका पालन
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 12:38 PM

नवी दिल्ली: शेती क्षेत्रामध्ये तरुणाईनं आधुनिक तंत्रज्ञान आणि इच्छाशक्तीच्या जोरावर पाऊल ठेवलं तर चित्र बदललं जाऊ शकतं, हे आपण अनेकदा पाहिलं आहे. शेती क्षेत्र आजही सर्वाधिक रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. हरियाणातील युवक नरेश जांग यानं गेल्यावर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर मधुमक्षिका पालन करण्याचा निर्णय घेतला. नरेश जांग त्यापूर्वी डिजीटल मार्केटिंगमध्ये काम करायचा. एक वर्षभरातचं नरेश जांग यांचा मधुमक्षिका पालन आणि प्रक्रिया उद्योग 20 लाखांवर पोहोचला आहे. (Naresh Jang Haryana started bee keeping during lockdown after quitting digital marketing job and now earning more than 20 lakh)

डिजीटल मार्केटिंगच्या अनुभवाचा फायदा

हरियाणा जिल्ह्यातील हिस्सार जिल्ह्यातील नरेश जांग हे शेती क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी डिजीटल मार्केटिंग तज्ञ म्हणून काम करत आहेत. नरेश जांग यांनी मधुमक्षिका पालन करण्यासोबत मधाचे विविध पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी एक स्टार्टअप सुरु केले. नरेश जांग यांनी एका कंपनीची नोंदणी केली. त्या कंपनीचं नाव स्क्रॉलिंग हे ठेवलं. डिजीटल मार्केटिंगमधील अनुभव असल्यामुळे कंपनीच्या उत्पादनांची विक्री करताना त्यांना फायदा झाला. वर्ष भरात त्यांच्या कंपनीची उलाढाल 20 लाखांवर पोहोचली आहे.

मधाच्या सहा फ्लेवरची निर्मिती

नरेश जांग यांच्या कंपनीतून सहा फ्लेवरचा मध तयार केला जात आहे. 3 ते 4 महिन्यांमध्ये 7 क्विटंल मधाचं उत्पादन झाल्याची माहिती त्यांनी दिली. पूर्वनोंदणी पद्धतीनं ते ऑर्डर स्वीकारतात आणि त्यानुसार पुरवठा करतात. नरेश जांग यांच्याकडे 170 मधपेट्या असून एका मधपेटीतून त्यांना 15 किलो मध मिळतो.

मधनिर्मितीत भारत पहिल्या पाच देशांमध्ये

जगातील सर्वात जास्त मधनिर्मिती करणाऱ्या देशांमध्ये पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश होतो. 2019-20 मध्ये भारतात 1 लाख 20 हजार टन मध निर्मिती झाली होती. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये मध उत्पादक शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच राज्यांमध्ये 10 हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या जाणार आहेत. याद्वारे मधउत्पादनावर विशेष भर दिला जाणार आहे.

भारतातून किती निर्यात होते?

राष्ट्रीय मधुमक्षिका बोर्डाच्या अहवालानुसार भारतात 9580 नोंदणीकृत शेतकरी आणि संस्थाद्वारे मधुमक्षिका पालन केले जाते. भारतानं 2019-20 मध्ये 59 हजार 536 मेट्रिक टन मध निर्यात केला. त्याद्वारे 633.82 कोटी रुपये भारताला मिळाले. तर 2018-19 मध्ये मधनिर्यातीतून 732.16 कोटी रुपये मिळाले होते.

भारतातून कोणत्या देशामध्ये मध निर्यात केला जातो?

भारत मधुमक्षिका पालन आणि मध निर्मितीमध्ये पुढे जात आहे. 2005-06 च्या तुलनेत भारतात सध्या मधनिर्मिती 242 टक्के वाढली आहे. भारत आआता अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार या देशांना मध निर्यात करतो. तर, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मध उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही दिवसांपूर्वी मधुक्रांती पोर्टलचं लाँचिंग केले आहे.

संबंधित बातम्या:

मध उत्पादनात जगातील पाच अग्रेसर देशांमध्ये भारताचा समावेश, जाणून घ्या मधमाशी पालनातून किती मिळते उत्पन्न

कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडून मधुक्रांती पोर्टलचं उद्घाटन, मध उत्पादकांसाठी फायदेशीर ठरणार

(Naresh Jang Haryana started bee keeping during lockdown after quitting digital marketing job and now earning more than 20 lakh)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.