नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचं पुढचं पाऊल, नाशिक सहकारी साखर कारखाना चालवण्याचा ठराव, महाराष्ट्रातील पहिला प्रयोग

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने आता नाशिक सहकारी साखर कारखाना चालवण्याचा निर्णय घेतलाय. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचं पुढचं पाऊल, नाशिक सहकारी साखर कारखाना चालवण्याचा ठराव, महाराष्ट्रातील पहिला प्रयोग
नाशिक बाजार समिती
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 1:20 PM

नाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने आता नाशिक सहकारी साखर कारखाना चालवण्याचा निर्णय घेतलाय. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचं संकट असल्यानं सर्व सभासदांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. सभासदांनी मंजुरी दिल्यानंतर बाजार समितीच्या संचालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात शासन स्तरावर परवानगीबाबत चर्चा करण्यात येणार आहे. (Nashik APMC decided to start Nashik co operative sugar mill on lease)

शेतकऱ्यांसाठी साखर कारखाना सुरु झाला पाहिजे

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने आता नाशिक सहकारी साखर कारखाना चालवण्याचा निर्णय घेतलाय. बाजार समितीच्या सर्व साधारण वार्षिक सभेत एकमताने ठराव करण्यात आला आहे.साखर कारखाना चालवण्यासाठी मात्र, सक्षम पार्टी, व्यावसायिकाने समंती दर्शवल्यास त्याला देखील पाठिंबा देणार असल्याचं जाहीर करण्यात आलय. मात्र, कोणीही साखर कारखाना चालवण्यास पुढं आलं नाही तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती पुढाकार घेईल, असं नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देविदास पिंगळे यांनी सांगितलं आहे.

सहकारमंत्र्यांशी चर्चा सुरु

नाशिक कृषी उत्पन्न समितीला साखर कारखाना चालवण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी राज्य शासनाशी चर्चा सुरु आहे. यासंदर्भात शासकीय स्तरावर परवानगी मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरु झालाय. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची संचालक मंडळाने नुकतीच भेट घेऊन माहिती दिलीय. सहकार मंत्र्यांनी यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यास सांगितलं आहे. नाशिक सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा निबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती देखील देविदास पिंगळे यांनी दिली. कारखाना ही शेतकऱ्यांची संस्था आणि नासिक कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांची संस्था आहे. त्यामुळे एखादी संस्था अडचणीत आल्यास त्याला सावरण्यासाठी हात देणं आवश्यक आहे. शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर आठ दिवसात प्रस्ताव सादर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

साखर कारखान्याची सद्यस्थिती

नाशिक सहकारी साखर कारखाना गेल्या सात वर्षांपासून बंद आहे. गेल्या 7 वर्षापासून बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू झाल्यास राज्यातला पहिला प्रयोग यशस्वी ठरणार आहे. कारखान्यातील 1200 कर्मचाऱ्यांवरून आता अवघे 135 कर्मचारी शिल्लक राहिले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीला कारखाना चालवण्यास परवागनी मिळाल्यास कारखान्याची गाळप क्षमता 1250 टन गाळपवरून 2500 ते 5000 टन पर्यंत 15 वर्षात नेऊ. कारखान्याद्वारे मोठ्या प्रमाणात साखर निर्मिती करण्याचे प्रयत्न करु अंसही बाजार समिती सभापतींनी सांगितलं. गाळप क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक मशिनरी नवीन घेण्याची तयारी ही दर्शविण्यात आली असल्याची यावेळी सांगण्यात आलंय.

इतर बातम्या:

मोठी बातमी, इफकोचा नॅनो यूरीया राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार, इफकोनं महाराष्ट्रात यावं, दादा भुसेंचं आवाहन

नाशिककरांचा शहर बससेवेला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद, 27 बसेस 164 मार्गांवर धावल्या

(Nashik APMC decided to start Nashik co operative sugar mill on lease)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.