AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना थेट शेताच्या बांधावर बाजारभाव कळणार; नाशिक कृषी बाजार समितीकडून ॲप लाँच

बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीनं पुढचं पाऊल टाकलंय. Nashik APMC develop mobile app for famers

शेतकऱ्यांना थेट शेताच्या बांधावर बाजारभाव कळणार; नाशिक कृषी बाजार समितीकडून ॲप लाँच
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती अ‌ॅप
| Updated on: Feb 09, 2021 | 11:52 AM
Share

नाशिक: बदलत्या काळा बरोबर बाजार समित्यादेखील आता आधुनिक होत आहेत. बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीनं पुढचं पाऊल टाकलंय. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीनं एका विशेष अ‌ॅपची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी अ‌ॅप तयार करण्यात आलंय. (Nashik APMC develop mobile app for famers to know agriculture product rates)

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची वारंवार होणारी फसवणूक बघता कृषी उत्पन्न बाजार समितीने एका अनोख्या आधुनिक ॲपची निर्मिती केली आहे.या ॲपमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे. ‘नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती’ अस या ॲपच नाव आहे. विशेष म्हणजे या ॲपच्या माध्यमातून दररोजचे शेतमालाचे बाजार भावदेखील क्षणार्धात समजणार आहेत, अशी माहिती सभापती देविदास पिंगळे यांनी दिली.

देविदास पिंगळेंच्या संकल्पनेतून अ‌ॅपची निर्मिती

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांसाठी मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी नाशिक जिल्हासह परजिल्ह्यातून देखील पालेभाज्या, फळभाज्या घेऊन शेतकरी येत असतात. त्याचप्रमाणे कांदा बटाटा लसूण व फळेदेखील येत असतात. शेतकऱ्याची सुरक्षितता वाढावी व त्यांची बाजार समिती आवाराबाहेर होणारी फसवणूक होऊ नये, यासाठी सभापती देविदास पिंगळे यांच्या संकल्पनेतून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ॲपची निर्मिती करण्यात आली आहे.

शेतकऱ्यासाठी बाजार समिती आवारात फळभाज्या, पालेभाज्या, कांदा लसूण ,बटाटा यास मिळालेला बाजार भाव दोन सत्रात प्रसिद्ध केला जाणार आहे. जेणेकरून ज्या शेतकऱ्यांस शेतमालास मिळालेला बाजारभाव माहिती होइल. सद्यस्थितीत नियमनमुक्तीमुळे व्यापारी हा शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करू लागला आहे. यात बाजारात शेतमालास काय बाजार भाव मिळाला, हे शेतकऱ्यास माहिती नसते. त्यामुळे आलेला व्यापारी हा बेभाव शेतमाल खरेदी करतो.

लिलाव प्रक्रियेदरम्यान, व्यापारी, आडते, हमाल किंवा अन्य कुणाकडून काही अडचण भासल्यास संबधित विभागाच्या कर्मचाऱ्यांशी या ॲपच्या माध्यमातून संपर्क साधता येणार आहे. शेतकऱ्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बाजार समितीने या ॲपची निर्मिती केली आहे. मात्र, सर्व शेतकऱ्यांनी हे ॲप आपल्या मोबाईलमध्य डाउनलोडन करून आपली नोंद करण्याचं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे करण्यात आलंय.

संबंधित बातम्या:

Bharat Bandh : मुंबईकरांना आज दूध आणि भाजीपाला मिळणार का? पाहा राज्याचा रिअ‍ॅलिटी चेक

मोठी बातमी: मुंबईत दुपारनंतर दुधाच्या गाड्या येणार नाहीत; दूध खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

Nashik APMC develop mobile app for famers to know agriculture product rates

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.