कांदा लिलावासाठी शेतकऱ्यांची गर्दी, लासलगावात सोशल डिस्टन्सिंगसाठी ऑनलाईन नोंदणीचं आवाहन

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे 12 मे पासून नाशिक जिल्ह्यात बंद असलेल्या 15 बाजार समित्या सोमवारी सुरु झाल्या. Lasalgaon ampc Farmers

कांदा लिलावासाठी शेतकऱ्यांची गर्दी, लासलगावात सोशल डिस्टन्सिंगसाठी ऑनलाईन नोंदणीचं आवाहन
लासलगावात शेतकऱ्यांची गर्दी
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 1:38 PM

नाशिक: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे 12 मे पासून नाशिक जिल्ह्यात बंद असलेल्या 15 बाजार समित्या सोमवारी सुरु झाल्या. शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजार समिती लासलगावमध्ये कांद्याचे लिलाव सुरु देखील झाले. मात्र, शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समिती आवाराच्या प्रवेशद्वारावर मोठी गर्दी केली होती. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांनी मोबाईल वरून बाजार समितीने दिलेल्या क्रमांकावर फोन करत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची सुविधा असतानाही बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर मोठी गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. पोलिसांनी यावेळी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. (Nashik farmers gathers at Lasalgaon ampc with large number or auction of onion social distancing violated)

दुसऱ्याचं दिवशी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन शिथील केल्याने बंद असलेल्या लासलगावसह जिल्ह्यातील कांद्याच्या बाजार समित्या सुरू झाल्या आहे. दररोज, नोंदणीकृत 500 वाहनातील कांद्याचे लिलाव केले जाणार आहेत. यामुळेआपल्या वाहनाची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजार समिती आवाराच्या प्रवेशद्वारावर मोठी गर्दी केली होती. परिणामी लासलगाव बाजारसमितीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

पोलिसांकडून समजावण्याचा प्रयत्न

लासलगाव बाजार समितीनं दिलेल्या क्रमांकावर मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची सुविधा दिलेली आहे. मात्र, तरिही बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. बाजार समितीचे सचिव आणि पोलिसांनी कोरोनाचा आपल्याला विसर पडला आहे का असे विचारत शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले.

कोरोना रोखण्यासाठी बाजारसमित्या 12 मे पासून बंद

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्यामुळे लासलगावसह जिल्ह्यातील कांद्याच्या प्रमुख 15 बाजार समित्या 12 मेपासून बंद ठेवण्यात आल्या होत्या. सोमवार पासून (24 मे) लासलगावसह सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा व धान्यचे लिलाव पूर्ववत सुरू झाले. लिलावला येताना शेतकऱ्यांनी कोरोनाची चाचणी करून येणे तसेच वाहन नोंदणी करणे बंधनकारक केलं असल्याची माहिती लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली होती.

संबंधित बातम्या:

Onion Price Today: शेतकऱ्यांच्या मागणीला यश, आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजार समिती सुरु

खाद्यतेलांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी महत्वाची बैठक, केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

(Nashik farmers gathers at Lasalgaon ampc with large number or auction of onion social distancing violated)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.