द्राक्ष पंढरीतील शेतकरी आक्रमक,निर्यातीवरील सबसिडी सुरु करण्याची मागणी
द्राक्ष निर्यातीला सबसिडी दिल्यास द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असं देविदास पिंगळे यांनी सांगितलं. subsidy for grapes export
नाशिक: राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे निर्यातक्षम द्राक्षावरील सबसिडी बंद करण्यात आलीय तर दुसरीकडे थंडीचं प्रमाण वाढल्यानं द्राक्षांना तडे जाण्याची भीती आहे. निर्यातक्षम द्राक्षांवरील सबसिडी बंद केल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत. नाशिक बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांनी केंद्र सरकारकडे तात्काळ सबसिडी चालू करास अशी विनंती केलीय. द्राक्ष निर्यातीला सबसिडी दिल्यास द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असं पिंगळे यांनी सांगितलं. तर,कंटेंनरच्या भाड्याची ही सबसिडी बंद केल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी संतप्त झालेत.(Nashik Grapes producer farmer demanded Center should resume subsidy for grapes export)
द्राक्ष निर्यातीवरील अनुदान बंद शेतकऱ्यांना दुहेरी फटका
मागच्या वर्षी कोरोना काळात केलेल्या लॉकडाऊनमुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आपले द्राक्ष निर्यात करता आले नाही. त्यामुळे त्यांना ते द्राक्ष स्थानिक बाजारपेठेत कवडी मोल किमतीत विकावे लागले होती. यंदाच्या वर्षी तरी या द्राक्ष उत्पादकांना दोन पैसे मिळतील अशी परिस्थिती होती. ऐन निर्याती वेळेस केंद्र सरकारने निर्यातीवर सुरू असलेले अनुदान बंद केल्याने द्राक्ष दर घसरले आहेत.
थंडीमुळे द्राक्षांना तडे जाण्याची भीती
गेल्या दोन दिवसांपासून थंडीत वाढ झाल्याने या द्राक्षांना तडे जाण्याची सुद्धा भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा दूर जाण्याच्या या भीतीने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. नाशिक जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातून दर वर्षी मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्ष निर्यात करत असतात. सबसिडी बंद करण्याच्या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. या निर्णयामुळे किलोमागे 25 ते 30 रुपये दर घसरल्याची माहिती शेतककऱ्यांनी दिली आहे.त्यामुळे तातडीने या निर्णयात बदल करून पुन्हा एकदा अनुदान सुरू करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढला
नाशकात थंडीचा जोर वाढला आहे. आज थंडीचा पारा 9 अंशावर घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. तर दुसरीकडे या थंडी मुळे द्राक्ष उत्पादक मात्र चिंतेत आहेत.हवामानात सततच्या बदलामुळे पुन्हा एकदा द्राक्ष बागायतदारांवर संकट कोसळण्याची चिन्ह दिसतायत.वाढत्या थंडीमुळे द्राक्षांसह इतर पिकांना ही फटका बसत असल्याने आधीच अडचणीत आलेला बळीराजा आणखी अडचणीत सापडला आहे.
कांद्यांनं पन्नाशी ओलांडली, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार?https://t.co/6YI7vbByDk#onionrates | #onion | #onionratehike | #Agrinews | #farmstories
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 11, 2021
संबंधित बातम्या:
Farmers protest: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्या बंद; माथाडी कामगारही संपावर
Bharat Bandh : मुंबईकरांना आज दूध आणि भाजीपाला मिळणार का? पाहा राज्याचा रिअॅलिटी चेक
(Nashik Grapes producer farmer demanded Center should resume subsidy for grapes export)