Nashik : खरिपात बी-बियाणांचा तुटवडा भासणार नाही , उत्पादनवाढीसाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न

महसूल मंडळनिहाय हवामानाचा अंदाज देणाऱ्या केंद्रांची संख्या वाढविण्‍यासाठी प्रयत्न करावेत, या हवामान केंद्रांच्या माध्यमातून बदलत्या हवामानाच्या अंदाजाची माहिती जिल्हापातळीवर एकत्रित करावी. जेणेकरून हवामानातील बदलाचा व नैसर्गिक आपत्तीचा शेतकऱ्यांना योग्यवेळी अंदाज येवून त्यादृष्टीने शेतकरी वर्ग उपाययोजना करू शकतील. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभापासून गरजू शेतकरी वंचित राहणार नाहीत, त्यांना आवश्यक प्रसंगी वेळेत कर्जपुरवठा व विमा रक्कम अदा केली जाईल यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील रहावे.

Nashik : खरिपात बी-बियाणांचा तुटवडा भासणार नाही , उत्पादनवाढीसाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न
नाशिक येथे खरीपपूर्व हंगाम बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे यांची उपस्थिती होती.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 5:29 PM

नाशिक : राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्या (Kharif Season) खरीप हंगामपूर्व आढावा बैठका पार पडत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक येथे पालकमंत्री छगन भजबळ, कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आढावा बैठक पार पडली आहे. यंदाच्या खरिपात (Seeds) बियाणांचा आणि खताचा पुरवठा करणे हीच महत्वाची बाब आहे. आणि त्याची खरेदी करताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून पेरणीपूर्वीच पीक कर्ज देखील शेतकऱ्यांना मिळावे असाच सूर खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत उमटला होता. या दरम्यान, (Agricultural Department) कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र, पीक निहाय माहिती आणि खत, बियाणांची किती आवश्यकता भासणार याचा लेखाजोखा मांडला. खत-बियाणांचा तुटवडा भासणार नाही शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीच्या अुनशंगाने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा पालकमंत्री भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

हवामानाचा अंदाज घेऊनच ठरवा पीक पध्दती

महसूल मंडळनिहाय हवामानाचा अंदाज देणाऱ्या केंद्रांची संख्या वाढविण्‍यासाठी प्रयत्न करावेत, या हवामान केंद्रांच्या माध्यमातून बदलत्या हवामानाच्या अंदाजाची माहिती जिल्हापातळीवर एकत्रित करावी. जेणेकरून हवामानातील बदलाचा व नैसर्गिक आपत्तीचा शेतकऱ्यांना योग्यवेळी अंदाज येवून त्यादृष्टीने शेतकरी वर्ग उपाययोजना करू शकतील. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभापासून गरजू शेतकरी वंचित राहणार नाहीत, त्यांना आवश्यक प्रसंगी वेळेत कर्जपुरवठा व विमा रक्कम अदा केली जाईल यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील रहावे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडून कर्जापोटी घेतलेल्या रकमेच्या बदल्यात त्यांची कृषी साधने जमा करू नयेत. पीक कर्जाचा लक्षांक साध्य होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दर आठवड्याला बँकांची बैठक घ्याव अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

पीक कर्जाच्या माध्यमातून आर्थिक मदत : कृषिमंत्री

शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी पिककर्जाच्या माध्यमातून आर्थिक मदत व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागाच्या बैठका घ्याव्यात. नॅनो युरियाचा वापर करून त्याचा ड्रोनमार्फत फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात यावी. तसेच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतंर्गत करण्यात आलेल्या कर्ज पुरवठ्याचा अहवाल नव्याने शासनास सादर करावा, असेही कृषिमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले आहे. तसेच खत विक्रेत्यांच्या मागणी व पीक पद्धतीनुसार तालुकानिहाय रासायनिक खतांचे वितरण करण्यात येणार असून खतांच्या विक्री व वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका, जिल्हा व विभागनिहाय 17 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

कृषी विभागही तत्पर

खरीप हंगामाच्या अनुशंगाने कृषी विभागानेही सर्वतोपरी तयारी केली आहे. कापूस लागवडीबाबत योग्य ते नियोजन करण्यात आले आहे शिवाय खत-बियाणे वेळेत मिळावेत अशा सूचना कृषी सेवा केंद्रांना देण्यात आल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतिश खरे, मालेगाव उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे उपस्थित होते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.