TV9 Marathi Impact: लासलगांव बाजार समितीत 75 वर्षांची पंरपरा रद्द, अमावस्येला कांदा लिलावाला सुरुवात

लासलगांव मुख्य कांदा बाजार आवारात प्रथमच 75 वर्षाच्या इतिहासात आज अमावस्येच्या दिवशी करून कांद्याचे लिलाव करण्यात आले. ऐतिहासिक घटनेच्या निमित्तानं फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

TV9 Marathi Impact: लासलगांव बाजार समितीत 75 वर्षांची पंरपरा रद्द, अमावस्येला कांदा लिलावाला सुरुवात
लासलगांव बाजार समितीमध्ये अमावस्येला लिलाव सुरु
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 12:30 PM

नाशिक: आशिया खंडात कांद्याची अग्रसर बाजारपेठ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत ऐतिहासिक घटना घडली. लासलगांव मुख्य कांदा बाजार आवारात प्रथमच 75 वर्षाच्या इतिहासात आज अमावस्येच्या दिवशी परमपूज्य भगरी बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कांद्याचे लिलाव करण्यात आले. ऐतिहासिक घटनेच्या निमित्तानं फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पहिल्या वाहनातील कांद्याला 2251 रुपये इतक्या बाजार भावाने खरेदी करण्यात आलं. (Nashik lasalgoan apmc started onion auction on Amavasya after 75 years)

75 वर्षांपासूनच्या परंपरेला फाटा

शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्यावतीने प्रत्येक राज्यांमध्ये बाजार समितीची राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आली. 1 एप्रिल 1947 मध्ये लासलगाव बाजार समितीची स्थापना करण्यात आली तेव्हापासून आजपर्यंत 75 वर्षांपासून एक परंपरा अवलंबली जात होती. ती म्हणजे दर महिन्याला येणाऱ्या अमावस्याला कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याच्या या परंपरेची टीव्ही 9 मराठीच्या बातमीची दखल घेत आज अमावस्येच्या दिवशी खंडीत करण्यात आली आहे.

600 गाड्या कांद्यांची आवक

परमपूज्य भगरी बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून फटाकेची आतषबाजी करत कांद्याचे लिलाव सुरु करण्यात आले. 600 वाहनातील 13 हजार क्विंटल कांद्याला कमाल 2251 रुपये ,किमान 700 रुपये तर सर्वसाधारण 1800 रुपये इतका बाजार भाव मिळाला असल्याचं लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितलं.

महिन्याच्या दर अमावस्येला लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद राहत होते. मात्र, आता आज अमावस्या असल्याने कांद्याचे लिलाव सुरू करण्यात आले आहे. माझ्या पहिल्या ट्रॅक्टर मधील कांद्याला भाव 2251 रुपये इतका प्रति क्विंटल कांद्याला बाजार भाव मिळाल्याने समाधानी असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सांगितलं आहे.

महिलांना लिलावात सहभागाची संधी

आशियातील कांद्याची अग्रेसर बाजार समितीमध्ये कृषी साधना महिला शेतकरी संस्थेवरुन व्यापाऱ्यांनी कादा लिलालावत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. टीव्ही 9 मराठीनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर व्यापाऱ्यांनी त्यांची भूमिका बदलली आहे. अखेर विंचूर येथील कृषी साधना महिला शेतकरी संस्थेला लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलावात सहभागी होण्यासाठी व्यापाऱ्यांनी बैठकीत नाफेडच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर सहमती दर्शवली.

संबंधित बातम्या:

V9 Marathi Impact: लासलगावात स्त्री शक्तीचा विजय, कांदा लिलावात सहभागी होण्यास व्यापाऱ्यांची सहमती

Onion Price Today: शेतकऱ्यांच्या मागणीला यश, आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजार समिती सुरु

अमावस्येच्या तोंडावर लासलगांव बाजार समितीचा दुसरा ऐतिहासिक निर्णय, 75 वर्षांची परंपरा बंद होणार

(Nashik lasalgoan apmc started onion auction on Amavasya after 75 years)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.