Nashik : कष्टाने पिकविलेल्या कांद्यावर वैऱ्याची नजर, युरिया मिश्रीत पाणी टाकल्याने कांदा नासला

यंदा मोठ्या कष्टाने कांदा पिक घेतले आहे. मात्र सध्या कांद्याला चांगला बाजारभाव नसल्यामुळे त्यांनी कांदा विक्री न करता चाळीत साठवणूक करण्याचा निर्णय घेतला होता.

Nashik : कष्टाने पिकविलेल्या कांद्यावर वैऱ्याची नजर, युरिया  मिश्रीत पाणी टाकल्याने कांदा नासला
कष्टाने पिकविलेल्या कांद्यावर वैऱ्याची नजरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 8:03 AM

मालेगाव – निसर्गाच्या लहरीपणाला आणि अनियमित वीज पुरवठा (Power supply) असताना देखील मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने (Farmer) कांदा पिकविला. पण बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांना कांदा (Onion) विक्री न करता चांगला बाजारभाव मिळण्याच्या प्रतिक्षेत कांदा चाळीत साठवण करुन ठेवला. मात्र कष्टाने पिकविलेल्या कांद्यावर वैऱ्याची नजर पडली अन् त्याने थेट कांदा चाळीतच युरिया मिश्रीत पाणी टाकले. त्यामुळे संपूर्ण कांदा नासला आहे. झालेल्या प्रकारामुळे शेतकऱ्याचे 70 ते 80 हजारांचे नुकसान झाल्याची घटना लोणवाडे शिवारात घडली आहे. या प्रकरणी शेतकऱ्याने पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात इसमाचा पोलिस शोध घेत आहेत.

मोठ्या कष्टाने कांदा पिक घेतले

पोलिसांकडे दाखल झालेली माहिती अशी आहे की, कांदा उत्पादक शेतकरी तुषार भुसे (रा. सोयगाव, मालेगाव) यांची लोणवाडे शिवारात शेती आहे. त्यांनी यंदा मोठ्या कष्टाने कांदा पिक घेतले आहे. मात्र सध्या कांद्याला चांगला बाजारभाव नसल्यामुळे त्यांनी कांदा विक्री न करता चाळीत साठवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कांदा चाळीत युरिया हे रासायनिक खत टाकल्याने संपूर्ण कांदा खराब होण्याला सुरुवात झाली आहे. यामुळे भुसे यांचे तब्बल 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी भुसे यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलील हवालदार खांडेकर तपास करीत आहेत.

शेतकऱ्यांची कडक कारवाईची मागणी

महाराष्ट्रात आत्तापर्यंत अशा अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. अनेकदा चांगल्या आलेल्या पीकाचे नुकसान केले जाते. केळीच्या पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित इसमांवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांची असते. कारण शेती करताना अधिक काबाडकष्ठ घ्यावे लागतात.

हे सुद्धा वाचा

हाता तोंडाला आलेलं पीक खराब झाल्याने शेतकऱ्यांचं वार्षिक आर्थिक बजेट कोलमडतं असतं. मालेगाव झालेल्या पीकाच्या नुकसानीनंतर अनेक शेतकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.