रात्रीच्या अंधारात शेतीचं नुकसान दिसणार आहे का? अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली की चेष्टा? शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाशिकच्या निफाड तालुक्यात केलेल्या अंधारातील पाहणी दौऱ्याची जोरदार चर्चा होत आहे. त्यावरुन शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे.
नाशिक : मागील सलग दोन आठवड्यात अवकाळी पाऊसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याची स्थिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारकडे भरपाई करून देण्याची मागणी शेतकरी करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या ठिकाणी पाहणी दौरा करत आहे. मात्र, त्यांचा नाशिक दौरा चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामध्ये अब्दुल सत्तार ज्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घ्यायला गेले होते त्याच शेतकऱ्यांना सरकारने सहा महिण्यात शेतकऱ्यांना मदत कशी केली हे पटवून सांगत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अब्दुल सत्तार यांचा रात्रीचा पाहणी दौरा शेतकऱ्यांची चेष्टा करण्यासाठीचा होता का ?असा सवाल अनेक शेतकरी उपस्थित करत आहे. त्यात द्राक्ष बागेत जाऊन पाहणी केली आणि चहा पिऊन अब्दुल सत्तार पुढे निघून गेले. त्यात फक्त निफाड मधील एकाच गावाला भेट दिल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
निफाड तालुक्यातील अनेक शेतकरी गहू, हरभरा, कांदे यांचं पीक घेतात. त्या शेतात कृषी मंत्री आलेच नाही. फक्त द्राक्ष बागांचेच नुकसान झाले आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित शेतकरी भडकले होते. त्यात आम्हाला गांजाची शेतीची परवानगी द्या असेही शेतकरी प्रतिक्रिया देत आहे.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील उत्तर पूर्व भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतमाल भुईसपाट झाला आहे. संप मिटला तरी अद्यापही काही ठिकाणी पंचनामे सुरू झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड संताप होत आहे.
अशातच काही शेतकऱ्यांनी मागील नुकसानीची भरपाई अजूनही मिळाली नाही म्हणून कृषीमंत्र्यांची अडचण केली होती. त्यात अब्दुल सत्तार यांनी सरकारने शेतकऱ्यांसाठी सहा महिण्यात खूप मदत केली आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलून या नुकसानी बाबत मदत करू असे आश्वासित केले आहे.
अब्दुल सतार यांच्या उत्तरावर आणि ठोस कुठलेही आश्वासन न दिल्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्या अब्दुल सत्तार यांनी नाशिककडे पाठ फिरवताच अनेक शेतकऱ्यांनी पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या होत्या. एकूणच कृषीमंत्री यांनी कुठलीही मदत जाहीर न केल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
निफाड तालुक्यात काही ठिकाणी गारपीठ झाली होती. त्यामध्ये शेतमाल अक्षरशः भुईसपाट झालेला असतांना त्याचा अद्याप पंचनामा नाही. त्यामुळे कृषीमंत्री यांनी फक्त फोटोसेशन करून दौरा संपविला का ? अशी चर्चा शेतकरी वर्गात होत आहे.