नाफेडकडून कांदा खरेदी बंद झाल्याने शेतकरी संतप्त, बाजारभाव कोसळल्याने मोठा फटका, सद्यस्थिती काय?

कांद्याची पंढरी म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. नाफेडपासून सुरू असलेली कांदा खरेदी अचानक बंद झाल्याने बळीराजा धास्तावला गेला आहे.

नाफेडकडून कांदा खरेदी बंद झाल्याने शेतकरी संतप्त, बाजारभाव कोसळल्याने मोठा फटका, सद्यस्थिती काय?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 12:46 PM

लासलगाव ( नाशिक ) : लाल कांदा बाजार भाव प्रश्नी हवालदिल झालेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रथमच नाफेड मार्फत लाल कांद्याची खरेदी सुरु करण्यात आली होती. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर लासलगाव येथील नाफेडच्या शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या केंद्रावर लाल कांदा खरेदी सुरु होती. ती अचानक बंद करण्यात आली आहे. शुक्रवारी जास्तीजास्त 1141 रुपयांवर असलेले दर आज 851 रुपयांपर्यंत दर घसरले आहे. गेल्या आठवड्यातील शुक्रवार च्या तुलनेत आज जास्तीत जास्त दरात 300 रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीसह राज्य तसेच देशांतर्गतील बाजार समितीमध्ये लाल कांद्याची प्रचंड आवक येण्यास सुरुवात झाली होती. मागणीच्या तुलनेत अधिक कांद्याची आवक झाल्यामुळे कांद्याचे बाजार भाव कोसळले आहे.

साधारण पणे कांद्याचे दर हे दोनशे ते चारशे रुपयांपर्यंत कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान नाफेड मार्फत लाल कांद्याची प्रथमच खरेदी सुरू झाली होती.

हे सुद्धा वाचा

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यातील शुक्रवार पर्यंत बारा हजार मॅट्रिक टन कांद्याची खरेदी साडेतीन हजार शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र अधिवेशन संपताच सुरू असलेली लाल कांद्याची खरेदी ही बंद करण्यात आली आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज बुधवारी सकाळच्या सत्रात 400 वाहनातून लाल कांद्याची तर 300 वाहनातून उन्हाळ कांद्याची अशी 14 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे.

लाल कांद्याला जास्तीत जास्त 851 रुपये, कमीतकमी 300 रुपये तर सरासरी 650 रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला तर नव्याने येत असलेल्या उन्हाळ कांद्याच्या बाजार भावाची काहीशी अशीच स्थिती आहे.

लाल कांद्याला जास्तीत जास्त 990 रुपये, कमीतकमी 600 रुपये तर सरासरी 800 रुपये प्रतिक्विंटल ला दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही भरून निघणार नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हा पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

कांद्याची पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. त्यात मागील काही महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी परवड निर्माण झाली आहे. त्यात आता पुन्हा नाफेडपासून सुरू केलेली कांद्याची खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.