टोमॅटोवर टिपक्या व करपा रोगाचा प्रादुर्भाव, हजारो हेक्टरवरील पीक संकटात, शेतकऱ्यांना मोठा फटका
येवल्यात टोमॅटो पिकावर टिपक्या व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं आहे. टिपक्या आणि करपा रोगामुळे हजारो हेक्टरवरील टोमॅटो पीक संकटात सापडले आहेत.

नाशिक : येवल्यात टोमॅटो पिकावर टिपक्या व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं आहे. टिपक्या आणि करपा रोगामुळे हजारो हेक्टरवरील टोमॅटो पीक संकटात सापडले आहेत. टोमॅटो उत्पादनात या हंगामात 50 टक्क्यांनी घट होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
येवला तालुक्यात अनेक ठिकाणी टोमॅटो पिकाची लागवड करण्यात आली आहे. रिमझिम पाऊस पडत असल्याने हवेतील आर्द्रतेमुळे टोमॅटो पिकावर काळा टिपका तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. टोमॅटो उत्पादनात 50 टक्क्यांनी घट झाली आहे.
उत्पादन कमी होणार असल्यानं संकट
येवला तालुक्यातील बल्हेगाव येथील शेतकरी किरण जमधडे यांनी दीड एकर मध्ये टोमॅटोचे पीक घेतलंय. पीक निघण्यास सुरुवात झाली मात्र ढगाळ वातावरणामुळे व सतत पडत असलेला रिमझिम पाऊसमुळे हवेत आर्द्रतेमुळे टोमॅटो पिकावर काळा टिपका तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. या शेतकऱ्याच्या टोमॅटो पिकाची पन्नास टक्के घट झाली आहे. उत्पादनात घट होणार असल्यानं शेतकरी हैराण झाला आहे. या शेतकऱ्याला 2000 कॅरेट पिकण्याची अपेक्षा होती. मात्र या रोगाचा प्रादुर्भावामुळे पन्नास टक्के उत्पादनात घट झाल्याने 1000 कॅरेट निघतील, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.
टिपका आण करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभ राहिल्याचं कृष्णा फड या शेतकऱ्यांनं सांगितलं आहे.
लासलगावात टोमॅटोच्या लिलावाला सुरुवात
आशिया खंडातील कांद्याची अग्रसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 ऑगस्टपासून टोमॅटो लिलावाचा शुभारंभ करण्यात आला आहे. कांद्याची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लासलगाव येथील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याबरोबर टोमॅटोचे ही लिलाव गेल्या काही वर्षापासून पार पाडले जात आहेत.
प. पु. भगरीबाबा धान्य आणि भाजीपाला आवारात 2 ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता टोमॅटो लिलावाचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी शेतकऱ्यांनी 1790 क्रेट्समधून टोमॅटो लिलावासाठी आणला होता. टोमॅटो लिलाव शुभारंभप्रसंगी 20 किलोच्या टोमॅटो क्रेट्सला कमाल 601, किमान 151 तर सर्वसाधारण 431 रुपये इतका बाजार भाव मिळाला, पण यावेळी व्यापारी, बाजार समिती कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
इतर बातम्या :
Nashik tomato farmers facing problems due to karpa