पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची परवड सुरुच, राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकाच्या भूमिकेमुळे शेतकरी संतप्त
दरवर्षी सरकारकडून बँकांना शेतकऱ्यांना पीक कर्जाचं अधिकाधिक वाटप करावे, म्हणून आदेश दिले जातात. मात्र, सहकारी बँका वगळता खासगी आणि व्यापारी बँकाकंडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना टाळाटाळ केली जाते.
वाशिम: खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतांसाठी लागणारी रक्कम उपलब्ध व्हावी म्हणून पीक कर्ज दिलं जाते. दरवर्षी सरकारकडून बँकांना शेतकऱ्यांना पीक कर्जाचं अधिकाधिक वाटप करावे, म्हणून आदेश दिले जातात. मात्र, सहकारी बँका वगळता खासगी आणि व्यापारी बँकाकंडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना टाळाटाळ केली जाते. यंदाही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी खासगी आणि व्यापारी बँकांचे उंबरठे झिजवायला लागत असल्याचं चित्र आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. (Nationalised and Private Banks not provide sufficient crop loan to farmers in Washim and All Maharashtra)
वाशिममध्ये 1025 कोटींचं उद्दिष्ट
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात 1025 कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. दरम्यान, 28 जूनअखेर विदर्भ ग्रामीण कोकण आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून त्यांना देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या 70 टक्क्यांच्या आसपास पीक कर्ज वाटप झाले आहे.
राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांवर शेतकऱ्यांचा संताप
राष्ट्रीयकृत, खासगी बँकांचे पीक कर्ज वाटपाचे प्रमाण 40 टक्क्यांच्या आत आहे. या बँकांचे उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. पीक कर्जासाठी वारंवार बँकाचे उंबरठे झिजवायला लागत असल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला जात आहे.
पीक कर्जासाठी सदाभाऊ खोत आक्रमक
रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पीक कर्ज वाटपावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यामध्ये खरीप हंगाम संपत आला तरी राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त पीक कर्जाचे वाटप झालेले नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे, असा आरोप करत सदाभाऊ खोत यांनी नाशिकमध्ये आंदोलन केलं आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर बैल आणि नांगर घेऊन निदर्शनं सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहेत.
पुणे जिल्हा बँक सप्टेंबरपर्यंत पीक कर्ज वाटप करणार
पुणे जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांसाठी 1 लाख 74 हजार 974 शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा घेतला लाभ आहे. या सर्व शेतकऱ्यांना मिळून आतापर्यंत एकूण 1 हजार 355 कोटी 57 लाख 13 हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आलं आहे. सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रासाठी हे कर्ज वाटप झाले आहे, दरम्यान, जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांना येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पीक कर्ज वाटप केले जाणार आहे.
Anil Deshmukh | सहाय्यकांच्या अटकेनंतर अनिल देशमुख रडारवर, ईडी चौकशीला हजेरीची शक्यता https://t.co/C48YT2ZaUp #AnilDeshmukh | #ED
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 29, 2021
संबंधित बातम्या :
(Nationalised and Private Banks not provide sufficient crop loan to farmers in Washim and All Maharashtra)