Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded : उन्हाळी हंगामात नवनवीन प्रयोग, उत्पन्न वाढीसाठी प्रथमच तिळाच्या क्षेत्रात वाढ

निसर्गाच्या लहरीपणामुळे जे खरिपात शक्य झालं नाही ते रब्बी हंगामात साध्य करण्याचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न शेतकरी करीत आहेत. आतापर्यंत उन्हाळी सोयाबीन, हरभरा क्षेत्रात वाढ झाल्याचे समोर आले होते पण शेतकऱ्यांनी तेलबियांच्या पिकामध्येही ज्यामधून अधिकचे उत्पन्न पदरी पडेल अशाच पिकांवर भर दिला आहे. आता जिल्ह्यातील शेतकरी तेलबिया म्हणून भुईमूगाची लागवड करीत होते पण यंदा तिळाची शेती बहरु लागली आहे.

Nanded : उन्हाळी हंगामात नवनवीन प्रयोग, उत्पन्न वाढीसाठी प्रथमच तिळाच्या क्षेत्रात वाढ
उन्हाळी हंगामात नांदेड जिल्ह्यामध्ये यंदा प्रथमच तिळाच्या शेतीचा प्रयोग करण्यात आला आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 10:06 AM

नांदेड : निसर्गाच्या लहरीपणामुळे जे (Kharif Season) खरिपात शक्य झालं नाही ते रब्बी हंगामात साध्य करण्याचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न शेतकरी करीत आहेत. आतापर्यंत (Summer Crop) उन्हाळी सोयाबीन, हरभरा क्षेत्रात वाढ झाल्याचे समोर आले होते पण शेतकऱ्यांनी  (Oilseeds) तेलबियांच्या पिकामध्येही ज्यामधून अधिकचे उत्पन्न पदरी पडेल अशाच पिकांवर भर दिला आहे. आता जिल्ह्यातील शेतकरी तेलबिया म्हणून भुईमूगाची लागवड करीत होते पण यंदा तिळाची शेती बहरु लागली आहे. बाजारपेठेचा अभ्यास करुन उत्पादन ठरवले जात असून शेतकरीही किती कमर्शियल झाला आहे याची प्रचिती येत आहे. शिवाय भुईमूगाला रानडुकराचाही कायम धोका राहतो. यावर पर्याय म्हणून तिळाचा पर्याय शेतकऱ्यांनी निवडला असून तो यशस्वी होताना पाहवयास मिळत आहे.

माहूर तालुक्यात सर्वाधिक तिळाचा पेरा

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल तर केला आहे पण अधिकचे उत्पादन मिळेल अशीच पीके शेतात बहरताना दिसत आहेत. उन्हाळी हंगाम असला तरी उपलब्ध पाण्यावर शिवार बहरत आहे. विशेषत: नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील सर्वच गाव शिवार तिळाच्या पांढऱ्या फुलांनी बहरलाय. एरव्ही माहूर तालुक्यात उन्हाळी हंगामात भुईमुंगाची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर होत असते, यंदा मात्र शेतकऱ्यांनी कमी कालावधीत आणि कमी खर्चात जादा उत्पन्न देणाऱ्या तिळाच्या पिकांची लागवड केलीय. पाण्याची उपलब्धता आणि पोषक वातावरणामुळे यंदा उन्हाळी हंगामात सर्वकाही साध्य होताना पाहवयास मिळत आहे.

तीळ फुलोऱ्यात, उत्पादनाची आशा

पहिल्या पेऱ्यातील तीळ हा सध्या फुलोऱ्यात आहे. पाण्याचे नियोजन आणि उन्हाचा कडाका हा यासाठी पोषक मानला जात आहे. त्यामुळेच तीळ फुलोऱ्यात आहे. दरवर्षी या भागातील शेतकरी भुईमूगाचे उत्पादन घेतात.मात्र, यंदा हा बदल केला असून यामधून अधिकचे उत्पन्न पदरी पडेल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. फुलोऱ्यात असणाऱ्या तीळाची महिन्याभरात काढणी कामे सुरु होतील असा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहे. दुष्काळजन्य भागात खरिपातील पिकांचा भरवसा नसतो तिथे आता उन्हाळी हंगामात शिवार हिरवागार होताना पाहवयास मिळत आहे.

तिळाच्या दरातही वाढ

तीळ हे तेलबिया असून याला बाराही महिने मागणी कायम असते. सध्या खुल्या बाजारात तिळाला 125 रुपये किलो असा दर आहे. शिवाय भुईमूगाप्रमाणे याची जोपासणा करणे जिकिरीचे नाही. त्यामुळे कमी कालावधीत अधिकचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी हा पर्याय निवडलेला आहे.

संबंधित बातम्या :

Buldhana : ऐकावे ते नवलच, अधिकारीच विकतात शेतकऱ्यांच्या जमिनी, शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

Russia Ukraine युद्धामुळे खाद्य तेलाचे दर वाढले, भंडारा जिल्ह्यात करडई तेलाचा वापर वाढला

FCI : गव्हालाही हमीभावाचा ‘आधार’, पंजाबला सर्वाधिक कोटा, केंद्र सरकारचे काय आहे धोरण?

कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा.
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश.
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात.
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना.
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन.