शेतकऱ्यांची सोशल मीडियावर नवी मोहीम, वाढदिवसाला बेकरी केकऐवजी फळं कापण्याचं अभियान
वाढदिवसानिमित्त बेकरीतून केक आणून कापण्यापेक्षा बाजारातून फळ आणून त्याचा केक बनवा, असं आवाहन केलं जात आहे. farmers appealing cutting fruit cake
मुंबई: सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल हे सांगता येत नाही. सध्या ग्रामीण आणि शहरी भागात शेतकऱ्यांच्या सोशल मीडिया ग्रुपवर एक अनोखी मोहीम राबवली जात आहे. वाढदिवसानिमित्त बेकरीतून केक आणून कापण्यापेक्षा बाजारातून फळ आणून त्याचा केक बनवा, असं आवाहन केलं जात आहे. ग्रामीण भागात या मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे. व्हॉटसअॅपवर फळांचे केक कापण्याचं आवाहन करणारे मेसेज फॉरवर्ड केले जात आहेत. काही फेसबुक ग्रुपनी यांची स्पर्धा देखील आयोजित केली आहे. (New trend on Social Media from farmers appealing cutting fruit cake at Birthday and other Programmes)
शेतकऱ्यांच्या मुलांकडूनही मोहिमेला प्रतिसाद
सध्या सोशल मीडियावर वाढदिवसासाठी केक ऐवजी शेतातील फळे कापून वाढदिवस साजरा करा’ हा ट्रेंड जोरात गाजत आहे.जेणेकरून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळांचा सन्मान होऊन त्यांची विक्री होईल.. याचेच अनुकरण करून पुण्यातल्या युवकांनी ती सत्यात उतरवली आणि कलिंगड व खरबूज व इतर फळांपासून अगदी जमेल तसा कापून केक बनवला अन् आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा केला, अशी माहिती शर्मिला येवले यांनी दिली.
अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना मदत
बेकरी मधील केकची किमंत एरव्ही केकसाठी चारशे-पाचशे रुपये लागातात.सध्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या फळांचे दर उतरलेले आहेत. वाढदिवस आणि इतर आनंदाच्या कार्यक्रमात बेकरीतील केक कापण्याऐवजी फळ कापल्यास याचा अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना फायदा होईल. गावातील प्रत्येक कुटुंबाने कलिंगड, खरबूज, चिक्कू, द्राक्ष, पपई आदी फळांचा वापर केक म्हणून केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल, सर्वांनी असा वाढदिवस करावा, असं मत वैभव लोमटे यानं व्यक्त केलं आहे.
थेट शेतकऱ्यांकडून खरेदीचं आवाहन
शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कमी किमतीला विक्री करावा लागतो. वाढदिवस आणि इतर आनंदाच्या कार्यक्रमात फळांचा केक कापल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केल्यास शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. शाकाहारी मित्र केक खाण्यास नकार देतात, फळांपासून बनवल्यामुळे तोही प्रश्न मिटतो. फळांपासून बनवलेला केक बनवलेला केक हा सुंदर दिसत आहे. शेतकऱ्यांप्रती आत्मीयता असणाऱ्यांनी फळांचा केक कापून शेतकऱ्यांच्या आर्थिकदृष्ट्या सुबत्ता येण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन त्या विद्यार्थ्यांनी केलं आहे.
आधी फडणवीसांकडून दिल्लीत जाऊन मोदी-शाहांची भेट, नंतर सिंग यांचं पत्रं, म्हणून संशय बळावला : हसन मुश्रीफhttps://t.co/JaoDVGWfUh#HasanMushrif #ParambirSingh #AnilDeshmukh @mrhasanmushrif @AnilDeshmukhNCP @Dev_Fadnavis
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 20, 2021
संबंधित बातम्या:
Video | बळीराजाला अवकाळीचा पुन्हा तडाखा , काढणीला आलेली पिकं मातीमोल
नाशिकच्या शेतकऱ्यांची कामगिरी दमदार, किसान रेल्वेद्वारे द्राक्ष निर्यातीतून 45 लाखांची कमाई
(New trend on Social Media from farmers appealing cutting fruit cake at Birthday and other Programmes)