लवकरच विनाबियांची संत्री-मोसंबी, नागपुरातील संस्थेचे संशोधन

विकसित केलेल्या नव्या प्रजातींमध्ये फक्त एक किंवा दोन बिया असून, येत्या चार ते पाच वर्षात ही फळं विदर्भातील बाजारपेठेत दिसणार आहेत. (Research of seedless oranges in Nagpur)

लवकरच विनाबियांची संत्री-मोसंबी, नागपुरातील संस्थेचे संशोधन
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 1:07 AM

नागपूर : संत्रीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या नागपुरात सीडलेस म्हणजेच बिया नसलेली संत्री आणि मोसंबीच्या नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. तसा दावा नागपुरातील केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थाने केला आहे. या संशोधन संस्थेने संत्रीच्या दोन आणि मोसंबीच्या चार अशा एकूण सहा नव्या प्रजाती विकसित केल्या आहेत. या सर्व प्रजातींमध्ये फक्त एक किंवा दोन बिया असून, येत्या चार ते पाच वर्षात ही फळं विदर्भातील बाजारपेठेत दिसणार असल्याचं संशोधन संस्थेनं सांगितलं आहे. (Research of seedless oranges in Nagpur)

केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थाने एकूण सहा सिडलेस प्रजाती विकसित केल्यायत. संत्री फळामध्ये डेजी आणि पर्ल या दोन, तर मोसंबीच्या चार नव्या प्रजाती आहेत. विदर्भात डेजी प्रजातीची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. तसेच संत्रीचे झाड जसे वाढेल तसेतसे उत्पादन देखील वाढेल, असे संशोधन संस्थेने सांगितले आहे. पर्ल टैजैंलो या प्रजातीकडे नागपुरी संत्रीला पर्याय म्हणून बघता येऊ शकते, असा दावा संस्थेने केला आहे.

मोसंबीमध्ये  विकसित केलेल्या प्रजातींची नावं ब्लड रेड माल्टा, जाफा, वेस्टीन आणि हेमलीन अशी  आहेत. येणाऱ्या चार किंवा पाच वर्षात या प्रजातींची फळं विदर्भातील बाजारपेठेत दिसणार असून शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल, तसेच त्यांच्या उत्पादनात वाढ होईल, असं संशोधन संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या :

Nanded Rain | नांदेडमध्ये पावसाची हजेरी, पावसामुळे शेतकरी हवालदिल

अकोले तालुक्यातील जांभळा निळा भात राज्यभर पोहोचणार, कृषी विभागाचे शेतकऱ्यांना सहकार्य

26 वर्षीय इंजिनीअरचा भन्नाट प्रयोग, मुंबईतील नोकरी सोडून दापोलीत काळा तांदूळ पिकवला

(Research of seedless oranges in Nagpur)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.