Nanded : दुष्काळात तेरावा, हिरवा चारा दुरापस्त, साठवलेल्या कडब्याच्या गंजीलाही आग
उन्हाळी हंगामात शेतकरी हिरव्या चाऱ्यावरही भर देतात. यंदा मात्र, चाऱ्यापेक्षा उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी इतर पिकांनाच महत्व दिले आहे. शिवाय आता ऊन्हामध्ये वाढ आणि पाणीपातळीत घट झाल्याने हिरवा चाऱ्याचे उत्पादन घेणे शक्य नाही. त्यामुळे जनावरांसाठी आता कडबा हाच चारा आहे. पण अशा दुर्देवी घटनेमुळे जनावरांच्या दावणीला काय टाकावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नांदेड : यंदाच्या खरीप अन् (Rabi Season) रब्बी हंगामात अवकाळी आणि (MSEB) महावितरणची अवकृपा काय असते याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला आहे. ज्याप्रमाणे अवकाळी पावासामुळे पिकांचे नुकसान झाले आहे त्याच बरोबरीने महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मध्यंतरी उसाचे आणि आता (Animal Food) कडब्याच्या गंजीचे नुकसान होत आहे. भर उन्हाळ्यात जनावरांना हिरवा चारा तर मिळणे शक्यच नाही पण ज्वारी कडब्याच्या लावलेल्या गंजीला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना बिलोली तालुक्यातील बोळेगांव येथे घडली आहे. यामध्ये तीन शेतकऱ्यांचा कडबा हा जळून खाक झाला आहे. गावाबाहेरील मैदानात शेतकऱ्यांनी कडब्याच्या गंजी लावल्या होत्या. भर उन्हात शॉर्टसर्किटमुळे अवघ्या काही वेळात या कडब्याची राख झाली होती.
हिरवा चारा दुरापस्त
उन्हाळी हंगामात शेतकरी हिरव्या चाऱ्यावरही भर देतात. यंदा मात्र, चाऱ्यापेक्षा उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी इतर पिकांनाच महत्व दिले आहे. शिवाय आता ऊन्हामध्ये वाढ आणि पाणीपातळीत घट झाल्याने हिरवा चाऱ्याचे उत्पादन घेणे शक्य नाही. त्यामुळे जनावरांसाठी आता कडबा हाच चारा आहे. पण अशा दुर्देवी घटनेमुळे जनावरांच्या दावणीला काय टाकावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अजून तीन महिने तरी साठवलेल्या चाऱ्यावरच जनावरांची भक भागणार आहे पण बोळेगाव येथील शेतकऱ्यांना आज जनावरांना काय टाकावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
उन्हाची दाहकता अन् शॉर्टसर्किटने गंजीला आग
बोळेगाव येथील तीन शेतकऱ्यांनी गावाला लागूनच असलेल्या मैदानावर कडब्याच्या गंजी लावल्या होत्या. मात्र, गंजीच्या जवळच विद्युत रोहित्र आणि विद्युत तारा ह्या गेलेल्या आहेत. दरम्यान, वाढते उन्हामुळे झालेल्या शॉर्टसर्किटमध्ये या तीनही गंजी आगीच्या भक्ष्यस्थानी झाल्या आहेत. वाळलेला कडबा असल्याने अवघ्या काही वेळात आगीने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे ग्रामस्थांचे प्रयत्नही निष्फळ ठरले.
अग्निशमनचे पाचारण मात्र, वेळ निघून गेल्यावर
एकाच लाईमध्ये असलेल्या कडब्याच्या गंजींना आग लागली होती. त्यामुळे आगीचे लोट सर्वदूर पसरल्याने शेतकऱ्यांनी बिलोली इथल्या फायर ब्रिग्रेडला संपर्क केला होता. काही वेळेमध्ये फायर ब्रिग्रेडला पाचारण झाले मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. तीन्ही गंजीचा कडबा हा जळून खाक झाला होता. यामध्ये शेतकऱ्यांचे 1 लाखाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी नुकासनभरपाईची मागणी केली आहे. त्यामुळे आता महावितरणची भूमिका काय राहते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.