Nashik : कांदा विक्रीत शेतकऱ्यांचीच नव्हे व्यापाऱ्याचीही फसवणूक, तोंडी व्यवहार पुन्हा अंगलट

सिन्नर तालुक्यातील चास येथील जगन्नाथ गंगाधर खैरनार यांनी बंगलोर येथील व्यापारी महेश रंगन्ना याला 11 लाख 67 हजार 629 रुपयांना 125 टन कांदा विकला होता. रंगन्ना याने खैरनार यांना यातील 2 लाख 11 हजार रुपये दिले. उर्वरित 9 लाख 56 हजार 629 रुपये बाकी ठेवल्याने खैरनार यांनी वेळोवेळी पैशांची मागणी करुनही त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली

Nashik : कांदा विक्रीत शेतकऱ्यांचीच नव्हे व्यापाऱ्याचीही फसवणूक, तोंडी व्यवहार पुन्हा अंगलट
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 12:08 PM

लासलगाव : आतापर्यंत कांदा खरेदीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. खरेदी-विक्री दरम्यान चोख व्यवहार नसल्याने असे प्रकार घडतात. पण सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे उपबाजारात अजबच प्रकार समोर आलायं. मोठ्या (Traders) व्यापाऱ्याने लहान व्यापाऱ्याला फसविले असल्याचे समोर आले आहे. (Onion) कांदा खरेदीतून तब्बल 10 लाखाची (Fraud) फसवणूक झाली आहे. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता स्थानिक व्यापाऱ्याला न्याय मिळतो का हे पहावे लागणार आहे.  त्यामुळे कांद्दाचे व्यवहार करताना कागदोपत्री लिखापडी असणे गरजेचे आहे. याबाबत उत्पादक संघटनेकडून जनजागृती केली जात आहे.

नेमकी घटना काय ?

सिन्नर तालुक्यातील चास येथील जगन्नाथ गंगाधर खैरनार यांनी बंगलोर येथील व्यापारी महेश रंगन्ना याला 11 लाख 67 हजार 629 रुपयांना 125 टन कांदा विकला होता. रंगन्ना याने खैरनार यांना यातील 2 लाख 11 हजार रुपये दिले. उर्वरित 9 लाख 56 हजार 629 रुपये बाकी ठेवल्याने खैरनार यांनी वेळोवेळी पैशांची मागणी करुनही त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली 4 वर्ष पैसे मागूनही मिळत नसल्याने खैरनार यांनी वावी पोलीस ठाण्यात येत रंगन्ना याच्याविरोधात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे.

सोलापूरमध्ये शेतकऱ्यांना फसवणूकीच्या घटना

वर्षाच्या सुरवातीला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी आवक सुरु होती. दरम्यान, शेतकऱ्यांना सौद्याच्य़ा दरम्यान काही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. त्यानंतर मात्र मागणी करुनही शेतकऱ्यांना त्यांचा परतावा मिळत नाही. उर्वरीत रक्कम ही काही दिवसांमध्ये देण्याचे व्यवहार झाल्यानंतर ठरते मात्र, ठरलेले तोंडी आश्वासन सगळेच पाळतील असे नाही. शिवाय व्यापाऱ्यांनी दिलेले चेकही बॉन्स झाले होते. यामुळे मात्र, मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मध्यंतरी सोलापूरमध्येही व्यापाऱ्यांवर फसवणूकी प्रकरणी तक्रारी दाखल झाल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

पोलीसांकडून तपास सुरु

सदरील घटनेतील व्यापारी महेश रंगन्ना हा मुळचा बंगलोर येथील आहे. पूर्वीपासून जगन्नाथ गंगाधर खैरनार यांनी त्याच्यासोबत व्यवहार केले होते. मात्र, गेल्या 4 वर्षापासून कारभारात नियमितता नाही. गेल्या 4 वर्षापासून व्यापारी महेश रंगन्ना यांनी जगन्नाथ खैरनार यांना पैसे परत केलेले नाहीत. त्यामुळे गन्ना याच्याविरोधात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत.पोलीसांकडून या प्रकरणाचा छडा लागतो की नाही हे पहावे लागणार आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.