Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Excess Sugarcane: आता शिल्लक उसाला अनुदान..! राज्य सरकारची घोषणा शेतकऱ्यांना प्रतीक्षा अंमलबजावणीची

मराठवाड्यात सर्वाधिक अतिरिक्त उसाचा प्रश्न भेडसावत आहे. येथील परस्थितीमुळे यंदा पहिल्यांदाच मे पर्यंत साखर कारखाने हे सुरु राहणार आहेत. असे असले तरी उसाचा प्रश्न मार्गी लागतो की नाही अशी स्थिती आहे. याकरिता साखर आयुक्त कार्यलयाकडून विशेष प्रयत्न सुरु असतानाच राज्य सरकारही शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणार आहे. कारण शिल्लक उसाला अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मात्र, अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला की अशा घोषणांचा पाऊस होत असल्याचा आरोप निलंग्याचे माजी आमदार तथा ऊस अभ्यासक माणिकराव जाधव यांनी केला आहे.

Excess Sugarcane: आता शिल्लक उसाला अनुदान..! राज्य सरकारची घोषणा शेतकऱ्यांना प्रतीक्षा अंमलबजावणीची
साखर आयुक्त कार्यालयाकडून आगामी गाळपाचे आतापासूनच नियोजन केले जात आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 11:34 AM

लातूर : मराठवाड्यात सर्वाधिक (Excess Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न भेडसावत आहे. येथील परस्थितीमुळे यंदा पहिल्यांदाच मे पर्यंत  (Sugar Factory) साखर कारखाने हे सुरु राहणार आहेत. असे असले तरी उसाचा प्रश्न मार्गी लागतो की नाही अशी स्थिती आहे. याकरिता साखर आयुक्त कार्यलयाकडून विशेष प्रयत्न सुरु असतानाच (State Government) राज्य सरकारही शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणार आहे. कारण शिल्लक उसाला अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मात्र, अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला की अशा घोषणांचा पाऊस होत असल्याचा आरोप निलंग्याचे माजी आमदार तथा ऊस अभ्यासक माणिकराव जाधव यांनी केला आहे.पण जर हा निर्णय झाला तर मराठवाड्यातील असंख्य शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे. कारण राज्यात अजूनही 90 लाख टन ऊस हा गाळपाविना फडातच उभा आहे.

काय आहे सरकारचे धोरण?

मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाल्याने आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यामध्ये लक्ष घातले आहे. शेतकऱ्यांच्या उसाचे कांडकही फडात शिल्लक ठेवणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवाय नुकसान टाळण्यासाठी उसाच्या उताऱ्यावर आणि वाहतूकीसाठी अनुदान दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्षात असा निर्णय अद्यापही झालेला नाही. त्यामुळे घोषणा तर चांगली आहे पण त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. हा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक हानी टळणार आहे.

नेमका कसा होणार शेतकऱ्यांना फायदा?

उसाच्या वजनावर उतारा हा ठरलेला असतो. वाढत्या उन्हामुळे उताऱ्यात घट होत आहे. त्यामुळे सरासरीच्या कमी उतारा आला तर 1 टक्का साखर घट उतारा अनुदान म्हणून प्रतिटन 225 टन मिळावेत अशी मागणी करण्यात आली आहे तर दुसरीकडे वाहतूरकीवरही अनुदान देण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. साखर कारखान्याच्या माध्यमातून 50 किलोमीटर पर्यंतच्या उसाची वाहतूक केली जाते. या शेतकऱ्यांच्या वाहतूकीची खर्च हा एफआरपी मधून घेतला जातो पण आता गाळप पूर्ण करताना 50 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरुन जर उसाची वाहतूक करावी लागली तर वाहतूकीसाठीही अनुदान दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा होणारा खर्च हे सरकार उचलणार आहे.

ही तर दरवर्षीचीच आश्वासने : माणिकराव जाधव

यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागतो की नाही अशी परस्थिती आहे. क्षेत्र वाढूनही केवळ योग्य नियोजन न झाल्यामुळे ही नामुष्की ओढावली आहे. मराठवाड्यातील शेतकरी उत्पादन वाढीच्या अनुशंगाने पीक पध्दतीमध्ये बदल करीत आहेत. मात्र, सध्या ऊस हा फडातच वाळून जात आहे. काही भागात तर शेतकरीच ऊस पेटवून देत आहेत. अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला की अनुदानाची आश्वासने ही ठरलेली आहेत. जोपर्यंत असा निर्णय आणि त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत काही खरे नाही. यापूर्वीच असा निर्णय झाला असता शेतकऱ्यांचे नुकसान तरी टळले असल्याचे माजी आमदार माणिकराव जाधव यांनी ‘tv9 मराठी’ शी बोलताना सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Cotton Crop : हंगामाच्या अंतिम टप्प्यातही ‘पांढऱ्या सोन्याला’ झळाळी, साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांची ‘चांदी’

Bhandara : धक्कादायक..! मुबलक पाणी असतानाही उन्हाळी पिकांनी माना टाकल्या, जमिनीलाही भेगा पडल्या, कारण काय?

Onion Crop : आवक घटूनही कांद्याचा वांदाच, खरिपात साधले उन्हाळी कांद्याचे गणितच बिघडले

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.