Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Positive News: अखेर शेतकऱ्यांना ज्याची प्रतिक्षा होती तो दिवस उजाडला, उत्पादन वाढीसाठी पुन्हा लगबग

हंगामातील गहू, हरभरा या पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे उत्पादनात घट तर होणारच आहे पण उत्पादनावर झालेला खर्च तरी पदरी पडतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. अखेर शेतकऱ्यांना ज्याची प्रतिक्षा होती तो दिवस उजाडला असून मंगळवारी सकाळपासून सूर्यदर्शन झाले आहे. त्यामुळे कीड-रोगराईचा प्रादुर्भाव कमी होऊन आता रब्बी हंगामातील पीके पुन्हा बहरतील असा आशावाद शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Positive News: अखेर शेतकऱ्यांना ज्याची प्रतिक्षा होती तो दिवस उजाडला, उत्पादन वाढीसाठी पुन्हा लगबग
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 10:43 AM

नांदेड : बळीराजाने चाढ्यावरुन मूठ काढली की खरीपपाठोपाठ (Rabbi Season) रब्बी हंगामातील पिकांबाबतही संकटाची मालिका सुरु झाली होती. कधी अवकाळी तर कधी गापरिट हे कमी म्हणून गेल्या काही दिवसांपासून (Nanded) नांदेड जिल्ह्यात धुक्याची चादर होती. त्यामुळे हंगामातील गहू, हरभरा या पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे उत्पादनात घट तर होणारच आहे पण उत्पादनावर झालेला खर्च तरी पदरी पडतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. अखेर शेतकऱ्यांना ज्याची प्रतिक्षा होती तो दिवस उजाडला असून मंगळवारी सकाळपासून सूर्यदर्शन झाले आहे. त्यामुळे (Pest) कीड-रोगराईचा प्रादुर्भाव कमी होऊन आता रब्बी हंगामातील पीके पुन्हा बहरतील असा आशावाद शेतकरी व्यक्त करीत आहेत. शिवाय मुबलक प्रमाणात पाणी असल्याने त्याचेही योग्य नियोजन करण्यावर शेतरकऱ्यांचा भर राहणार आहे.

महिन्यानंतर झाले सूर्यदर्शन

विदर्भामध्ये गारपिट तर मराठवाड्यात ढगाळ वातावरण असेच चित्र गेल्या महिन्याभरापसून होते. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. विशेषत: मुख्य पीक असलेल्या हरभरा आणि गव्हावर याचा परिणाम झाला आहे. हरभरा पिकावर घाटीळीचा तर गव्हावर तांबोरा रोगाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत होता. यातच गेल्या पाच दिवसांपासून दाट धुके पडत होते. त्यामुळे ज्वारीवरही लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला होता. रब्बीतील सर्वच पिकांवर धोक्याची घंटा असताना मंगळवारची सकाळ एक नव्या आशेचा किरण घेऊन उजाडली आहे. सूर्यदर्शन झाल्यामुळे शेती कामांना सुरवात होणार असून आता योग्य ते नियोजन केले जाणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

पाण्याचाही योग्य वापर

यंदा रब्बी हंगामातील पिके जोपासण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी असूनही त्याचा उपयोग होत नव्हता. प्रतिकूल वातावरणामध्ये पिकांना दिल्यास त्यामुळे अधिकचे नुकसानच होणार होते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती ती वातावरण निवाळण्याची. अखेर तो दिवस उजाडला आहे. मंगळवारी दिवस उजाडताच सूर्यदर्शन झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची शेती कामाची लगबग सुरु झाली होती. आता पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करण्याची नामुष्की ओढावू नये अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. ढगाळ वातावरणामुळे या पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव होऊन चिकटा वाढला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी निंबोळी अर्क 10,000 पीपीएम 10 मिली किंवा डायमेथोएट 30 टक्के 20 मिली प्रति 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे.

उत्पादन वाढवण्याची संधी

नांदेडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण होते, त्यामुळे मर रोगासह अळीचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र आता पडत असलेल्या कडक उन्हामुळे ह्या रोगाचा प्रादुर्भाव नाहीसा होईल अशी अपेक्षा आहे. तरीही काही प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव आढळला गरजेप्रमाणे फवारणी करावी असे आवाहन कृषीतज्ञाने केलय. त्यासोबतच आता पिकांच्या वाढीसाठी पोषक खतांची मात्रा द्यावी असा सल्लाही कृषी विभागाने दिलाय.

संबंधित बातम्या :

Millet Crop : बाजरी उत्पादन वाढीची सोपी पध्दत, पेरणीपासून काढणीपर्यंतचे असे करा नियोजन

Sunflower: फरदड कापसाला काय आहे पर्याय? मशागत कमी अन् उत्पादन अधिक, वाचा सविस्तर

Sugarcane Sludge : राज्यात 5 लाख टन ऊसाचे गाळप, ‘या’ विभागाची आघाडी कायम

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.