Positve News | रब्बीवरील संकटाची मालिका संपुष्टात, थंडीच्या कडाक्यात बहरतोय हरभरा

उगवण होण्यापूर्वीच रब्बी हंगामातील पिकांवर अवकाळी पावसाचे सावट होते. खरीपात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या नियोजनावर पाणी फेरले गेले होते. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तर दुबार पेरणी करावी लागली होती. मात्र, आता पेरणी होऊन पंधरवाडा ओलांडला असताना नांदेड जिल्ह्यातील शेतशिवार पिकांना हिरवागार झाला आहे.

Positve News | रब्बीवरील संकटाची मालिका संपुष्टात, थंडीच्या कडाक्यात बहरतोय हरभरा
रब्बी हंगामात हरभरा क्षेत्रात वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना आता हमीभाव केंद्राचा आधार मिळणार आहे.
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 11:01 AM

नांदेड : उगवण होण्यापूर्वीच (Rabi season) रब्बी हंगामातील पिकांवर (Untimely Rain) अवकाळी पावसाचे सावट होते. खरीपात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या नियोजनावर पाणी फेरले गेले होते. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तर दुबार पेरणी करावी लागली होती. मात्र, आता पेरणी होऊन पंधरवाडा ओलांडला असताना (Nanded) नांदेड जिल्ह्यातील शेतशिवार पिकांना हिरवागार झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने तर उघडीप दिलेली आहेच शिवाय या हंगामातील पिकांना पोषक असणारी थंडी सुरु झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी ही पिके बहरताना पाहवयास मिळत आहे. वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलेला होता. पण आता हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

हरभरा पिकाला पोषक वातावरण

रब्बी हंगामातील प्रत्येक पिकांसाठी थंडी असणे आवश्यक असते. तरच पिकांची वाढ जोमात होते. मात्र, पेरणीनंतर लागलीच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती तर पुन्हा ढगाळ वातावरणामुळे हवेत दमटपणा निर्माण झाला होता. परिणामी हरभाऱ्यावर घाटीअळी आणि मर रोगाचा प्रादुर्भाव हा वाढत होता. त्यामुळे खरीपाप्रमाणेच रब्बीची अवस्था होणार का असा सवाल उपस्थित होत असतानाच आता थंडीत वाढ झाली आहे तर वातावरणही कोरडे असल्याने पिकांची वाढ जोमात होणार आहे. वातावरणातील बदलाचा फटका आतापर्यंत खरीप हंगामासह फळबागांवरही झाला आहे. आता किमान रब्बीमध्ये तरी हे संकट दूर होऊन उत्पादनात वाढ हाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

यंदा हरभरा पिकावरच शेतकऱ्यांचा भर

दरर्षी मराठवाड्यात ज्वारी या पिकाचे क्षेत्र सर्वाधिक असते. आता मात्र, उत्पादन वाढीच्या अनुशंगाने पीक पध्दतीमध्ये बदल होत आहे. शिवाय कृषी विभागानेही हरभरा या पिकाचाच पेरा करण्याचे आवाहन केले होते. एवढेच नाही तर हरभरा बियाणाचे अनुदानावर वाटपही करण्यात आले होते. कृषी विभागाच्या आवाहनाला साद घालत हरभरा पिकाचा टक्का तर वाढला पण योग्य जोपासणा होणेही तेवढेच गरजेचे आहे. वातावरणातील बदल आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे कायम शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे. त्यामुळे आता पोषक वातावरण राहिले तर उत्पादनात वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

रोगराईचा प्रादुर्भाव झाला कमी

वातावरणातील बदलामुळे पिकांची उगवण होताच किडीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावा लागली होती. पण आता वातावरण कोरडे झाले असून गेल्या चार दिवसांपासून कडाक्याची थंडी सुरु झाली आहे. त्यामुळे घाटीअळी, मर रोगाचा प्रादुर्भाव हा कमी झाला असून केवळ हरभराच नाही तर सर्वच पिकांची वाढ जोमाने होऊ लागली आहे.

असे करा व्यवस्थापन

पाण्याची उपलब्धता असल्याने रब्बी पिकाकडे शेतकरी मोठ्या संख्येने वळले आहेत. त्यातच सर्वाधिक पेरा हा हरभरा पिकाचा झालाय. सध्या काही भागात हरभरा पिकांवर मर रोगांचा प्रादुर्भाव आढळल्यास शेतकऱ्यांनी निंबोळी अर्काची फवारणी करावी, त्यानंतर गरज पडल्यास कीड प्रतिबंधात्मक फवारणी करावी जेणेकरून हरभरा पीकाचे चांगले उत्पादन येईल असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केलय.

संबंधित बातमी :

Pik Vima : विमा कंपन्यांचे पहिले पाढे सुरु ; मनमानी कारभारामुळेच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम

यवतमाळची जरबेराची फुलं थेट नवी दिल्ली ते हैदराबादच्या बाजारपेठेत, तीन मित्रांची गोष्ट, आत्महत्याग्रस्त जिल्हा ही ओळख पुसण्याचा निर्धार

रब्बी हंगामातील पिकांच्या पाण्याचे असे करा व्यवस्थापन, वेळेत बहरतील पिके अन् उत्पादनातही वाढ

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.