Agriculture News Today : अवकाळी पावसामुळे शहापूर तालुक्यातील भेंडी उत्पादक शेतकरी संकटात
भेंडीवर चिकट्या,बुरशी तसेच पाने गळून पडून करप्या असे रोग पडू लागल्याने शेतकरी चिंतेत आहे, लागवडीसाठी झालेला खर्च निघणार नसल्याची भीती.
ठाणे : खराब हवामानाचा व अवकाळी पावसाचा फटका शहापूर (shahapur) तालुक्यातील भेंडी उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) पडला आहे. यामुळे भेंडीची कळी गळणे, भेंडीवर चिकट्या, बुरशी तसेच पाने लाळ पडून करप्या असे रोग पडुन उत्पादनात घट होणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर देखील याचा परिणाम होणार आहे. या रोगीट हवामानामुळे शेतकरी चिंतेत सापडला असल्याचे चिञ आहे. राज्यात अनेक पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर राज्यात अनेक जिल्ह्यात मागच्या दोन दिवसात मुसळधार पाऊस (maharashtra rain update) झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
शेतकरी भेंडी व काकडीची लागवड करतात
चरीव गावातील बहुसंख्य शेतकरी भेंडी व काकडीची लागवड करत असतात,त्यासाठी महागडी बी-बियाणे,खते,औषधे वापरावी लागतात. माञ आता हवामानात बदल झाला असून गेले तीन दिवस खराब हवामान व पावसाच्या हलक्या सरी पडल्याने रोगीट वातावरण तयार झाले आहे. यामध्ये उत्पादनात घट होणार असून भेंडीचे उत्पादन चांगल्या प्रकारे निघायला सुरूवात झाली आहे. या खराब हवामानामुळे शेतकऱ्यांची पुरती निराशा केल्याने शासनाकडे मदतीची मागणी शेतकरी करीत आहे.
शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
राज्यात मागच्या चार दिवसांपासून काही जिल्ह्यात पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीज पडल्यामुळं देखील नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या फळांच्या बागा उद्धवस्त झाल्या आहेत. त्याचबरोबर काढणीला आलेली रबी पीक त्यामुळं खराब झाली आहे.
मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली
पुढचे आणखी दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी हवामान खात्याने पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. सकाळी मुंबईतील काही भागात पावसाच्या तुरळक सरी झाल्या. मुंबई शेजारी असणाऱ्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.