Banboo : कमी खर्चात करायचे आहे अधिक उत्पन्न तर करा बांबूची शेती, ४० वर्षांपर्यंत मिळणार फायदा
पहाडी भागात बांबूपासून घर बनवले जाते. नदी तसेच नहरांवर बांबूपासून पूल तयार केले जातात. त्यावरून रोज शेकडो लोकं ये-जा करतात.
मुंबई : बांबूचा उपयोग शेती तसेच बांधकामात होतो. बांबूपासून सर्वाधिक वस्तू तयार केल्या जातात. भारत एक कृषीप्रधान देश आहे. ७५ टक्के लोकांची उपजीविका कृषीवर आधारित आहे. पारंपरिक शेतीसोबत भाजीपाला लागवड केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात. शेतकरी दीर्घ कालावधीसाठी नफा मिळवू इच्छित असतील तर त्यांनी बांबूची शेती करावी. बांबूच्या शेतीसाठी राज्य सरकार अनुदान देते. परंतु, देशात बांबूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. बाजारात बांबूची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.
बांबूपासून तयार होतात या वस्तू
बांबूचा उपयोग शेतीच्या कामासाठी तसेच बांधकामासाठी होतो. बांबूपासूनच अनेक वस्तू तयार केल्या जातात. बांबूपासून खेळणे, चटई, फर्निचर, सजावट सामान, टोकऱ्या, भांडे आणि पाण्याची बॉटल यांची मागणी जास्त आहे. पहाडी भागात बांबूपासून घर बनवले जाते. नदी तसेच नहरांवर बांबूपासून पूल तयार केले जातात. त्यावरून रोज शेकडो लोकं ये-जा करतात. बांबूची शेती करणारे शेतकरी चांगली कमाई करू शकतात.
एक हेक्टरमध्ये लावा इतके रोप
रेताळ जमीन सोडून कोणत्याही ऋतूमध्ये बांबूची शेती केली जाते. बांबूची शेती करण्यासाठी शेतीची मशागत करावी लागत नाही. दोन बाय दोनचे खड्डे खोदून तुम्ही बांबूचे रोप लावू शकता. खत म्हणून शेणाचा वापर करू शकता. एक हेक्टर बांबूची शेती सुरू करायची असेल, तर १ हजार ५०० रोप लावता येतील. तीन वर्षांनंतर बांबू तयार होतो. म्हणजे बांबूची कटाई केली जाऊ शकते.
एक हेक्टर बांबूपासून दरवर्षी तीन लाख कमाई
बांबूच्या शेतीचे वैशिष्ट्ये म्हणजे एक वेळा लागवड केल्यानंतर ४० वर्षांपर्यंत बांबूची कटाई करता येते. या शेतीमध्ये मेहनत तसेच खर्च खूप कमी आहे. बांबूचा उपयोग कागद बनवण्यासाठी केला जातो. एक हेक्टरमध्ये बांबूची लागवड करत असाल तर दरवर्षी तीन लाख रुपये कमाई करू शकता.
थंडीच्या प्रदेशात बांबूची शेती होत नाही. उष्णता आणि पाऊस पडल्यास बांबूची चांगली वाढ होते. काश्मीरचा भाग सोडून देशात कुठंही बांबूची शेती होऊ शकते. देशातील पूर्वोत्तर राज्यात बांबूची सर्वाधिक शेती होते.