Organic Farm : कारल्याचा गोडवा, उत्पादनाबरोबरच वाढीव दराने एका एकरात घडला चमत्कार..!

उत्पादन वाढीसाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहेत. मात्र, भाजीपाल्याकडे शेतकरी दुर्लक्ष करतात. मात्र, रवींद्र घोलप यांनी मुख्य पिकांचे दर आणि सध्याचे भाजीपाल्याचे मार्केट यामधील दरी ओळखून घोलप यांनी केवळ एका एकरात कारल्याची लागवड केली होती.केवळ लागवडच नाही सेंद्रिय पध्दतीने कारल्याची जोपासना केली.

Organic Farm : कारल्याचा गोडवा, उत्पादनाबरोबरच वाढीव दराने एका एकरात घडला चमत्कार..!
कारले भाजीपाल्यातून विक्रमी उत्पादन
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 11:21 AM

जुन्नर : शेती ही निसर्गावर अवलंबून असली तरी बदलत्या निसर्गाच्या चक्राबरोबर (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल केला तर काय होऊ शकते हे जुन्नर तालुक्यातील रोहकडीच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. पारंपरिक पिकांना तर त्यांनी केव्हाच फाटा दिला आहे. शिवाय फळबागांच्या मोहातही न पडता  (Vegetable) भाजीपाल्यातून उत्पन्नात भरघोस वाढ केली आहे. (Bitter gourd) कारले, चवीला कडू असले तरी रोहकवाडीच्या रवींद्र घोलप यांना उत्पन्नाच्या माध्यमातून त्याचा गोडवा लक्षात आला आहे. त्यामुळेच त्यांनी एक एकरात कारल्याची लागवड केली होती. आता याच कारल्याला जागेवर 35 रुपये किलो असा दर मिळत आहे. शिवाय भविष्यात दरात वाढ ही निश्चित मानली जात आहे. सध्या मुख्य शेतीमलाच्या दरात घट तर भाजीपाल्याला विक्रमी दर मिळत आहे. टोमॅटो 70 रुपये तर कारले 60 रुपये किलो असे बाजारपेठेतले चित्र आहे.

सेंद्रिय शेतीपध्दतीने अधिकच गोडवा

उत्पादन वाढीसाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहेत. मात्र, भाजीपाल्याकडे शेतकरी दुर्लक्ष करतात. मात्र, रवींद्र घोलप यांनी मुख्य पिकांचे दर आणि सध्याचे भाजीपाल्याचे मार्केट यामधील दरी ओळखून घोलप यांनी केवळ एका एकरात कारल्याची लागवड केली होती.केवळ लागवडच नाही सेंद्रिय पध्दतीने कारल्याची जोपासना केली. रासायनिक खतांचा मारा नाही. केवळ सेंद्रिय पध्दतीने कारल्याची जोपसणा केल्याने त्याला अधिकचा दर मिळत आहे. घोलप यांच्या शेतावर व्यापारी हजेरी लावून जागेवर 30 ते 35 रुपये किलो असा दर मिळत आहे.

यशस्वी प्रयोगासाठी, योग्य व्यवस्थापन

केवळ लागवड करुन उत्पादन पदरी पडले असे नाही तर घोलप यांनी तीन महिने अथक परिश्रम आणि योग्य नियोजन करुन त्यांनी ही किमया साधली आहे. निसर्गाचा लहरीपणा असताना पाण्याचे योग्य नियोजन आणि खताचा डोस यामुळे हे साध्य झाले आहे. या दरम्यानच्या काळात घोलप यांनी इतर कोणत्याही पिकांची लागवड केली नाहीतर केवळ कारल्याचे उत्पादन वाढीवर भर देण्यात आला होता. सध्या बाजारपेठेत कारल्याची आवक सुरु असून पावसाळ्यात आणखीन दर वाढतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

एका एकरातून लाखोंचे उत्पादन

मुख्य पिकांतून जी किमया साधली जात नाही ते भाजीपाल्यातून घोलप यांनी करुन दाखवलं आहे. एक एकरावरच त्यांनी कारल्याची लागवड केली तरी त्याचे योग्य नियोजन हेच उत्पादनवाढीचे गमक राहिले आहे. कारल्याला अधिकचा दर असतोच पण आता पावसाळ्याच्या तोंडावर दरात वाढ झाल्याने घोलप यांना अधिकचा फायदा झाला आहे. आता कारल्याचे पीक दरवर्षी घेतले जाणार असल्याचा निर्धार घोलप यांनी केला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.