विंचूर येथील कांदा हैदराबाद बाजार समितीत विक्रीसाठी नेण्याची व्यवस्था होणार, हर्षवर्धन जाधव यांचं आश्वासन
औरंगाबाद नंतर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि विंचूर येथील कांदा हैदराबाद बाजार समितीत विक्रीसाठी नेण्याची व्यवस्था पुढील आठवड्यापासून केली जाणार आहे, अशी माहिती हर्षवर्धन जाधव सांगितली.
नाशिक : कांद्याची (onion rate) नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव (lalasgaon) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार विंचूर येथे बुधवार रोजी कांद्याचे बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांनी थेट कांदा लिलाव बंद पडून आपला संताप व्यक्त केला होता. ही बातमी tv9 मराठीवर पाहून बीएसआर पक्षाचे महाराष्ट्रातील समन्वयक हर्षवर्धन जाधव थेट विंचूर येथे आज दाखल होत शेतकऱ्यांशी चर्चा केली. कांद्याचे लिलाव पाहून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बीआरएस पक्षाच्या मदतीने औरंगाबादनंतर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि विंचूर येथील कांदा हैदराबाद (hydrabad onion rate) बाजार समितीत विक्रीसाठी नेण्याची व्यवस्था, पुढील आठवड्यापासून केली जाणार असल्याचे जाहीर करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे. तेलंगणा राज्यातील बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात विस्तार करण्याची रणनीती आखली आहे. ग्रामीण भागातही पक्षाचा विस्तार करण्यासाठी थेट शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या कांद्याचे बाजार भाव घसरत असल्याचं त्यांच्या लक्षात आले आहे. तेलंगण सरकारची मुख्य भूमिका शेतकरी आहे, महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने देशातील एक भाग असल्याने आम्ही शेतकऱ्यांच्या मदतीला आलो आहोत. छत्रपती संभाजीनगर इथून शेतकऱ्यांचा कांदा तेलंगण राज्यातील हैदराबाद येथे पाठवला असता 1900 ते 2000 रुपये इतका बाजार भाव मिळाल्याचे शेतकरी सांगत आहेत.
तेलंगण राज्यातील हैदराबाद बाजार समिती ही विंचूर प्रमाणे बाजार समिती आहे. तेथे आम्ही कांदा खरेदी करत नसून आणि कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांना सहकार्य करतो. राज्यकर्त्यांनी काही चुकीचे होत असेल, तर त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. ही बाब आम्ही त्या ठिकाणी करतोय त्यामुळे तेथे कांद्याला चांगला बाजार भाव मिळत आहे. ही राज्य सरकारने लक्ष दिले पाहिजे ही भूमिका होती. पण सरकार काही करत नसल्याने येथे कांद्याला बाजार भाव नाही असं बीएसआर पक्षाचे महाराष्ट्रातील समन्वयक, हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले.
विंचूर बाजार समिती कांद्याच्या लिलावत 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटलने कांद्याची विक्री होते, हाच कांदा तेलंगणामध्ये दोन हजार रुपयात विक्री होतो. कन्नडच्या शेतकऱ्यांना हा भाव मिळत आहे असंही जाधव म्हणाले.