नाशिक: महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाची परिस्थिती वाढल्यानंतर ब्रेक द चैन नियम लागू करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्ह्यातील लासलगावसह सर्व बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोना संसर्ग कमी झाल्यानं बाजार समित्या सुरु करण्यात आल्या आहेत. आता कांदा लिलावाला सुरुवात झाल्यानंतर कांद्याला गतवर्षीच्या तुलनेत चांगला दर मिळत आहे. गेल्या वर्षी कांद्याला 500 ते 650 क्विंटल इतका भाव मिळाला होता. यंदा नाशिकमध्ये कांद्याचे भाव 1500 ते 2255 रुपयांच्या दरम्यान गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.मात्र, चांगल्या प्रमाणात नफा मिळवायचा असल्यास कांद्याला प्रति किलोला 30 रुपयांचा भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. (Onion Price Today Nashik Apmc onion price increased farmers happy for better rates )
महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे प्रमुख भारत दिघोळे यांनी नाशिकच्या पिंपळगाव बाजरसमितीमध्ये गुरुवारी कांद्याला 1601 ते 2255 च्या दरम्यान भाव मिळाल्याचं सांगितलं. तर, कळवणच्या बाजारसमितीमध्ये 1900 ते 2000 हजार रुपये कमाल भाव तर 1600 ते 1700 रुपये किमान भाव राहिला. येवल्यामध्ये हा दर 1700 रुपयांवर होता, असं भारत दिघोळे म्हणाले.
भारत दिघोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार बाजार समित्या बंद ठेवण्यापूर्वी कांद्याचा दर 1500 ते 1600 इतका होता. आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या लासलगावात कांद्याची आवाक 15100 क्विंटल झाली. तिथे कांद्याचा किमान दर 750 , मॉडेल प्राईस1500 तर कमाल दर 1971 रुपये क्विंटल राहिला.
तोक्ते आणि यास चक्रीवादळाच्या प्रभावमुळे यूपी आणि बिहार या कांदा उत्पादनाला फटका बसला आहे. कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतातचं कांदा सडून गेला असल्यानं बाजारात येणाऱ्या कांद्याच्या प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी येत्या काळामध्ये कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आल्यानंतर 12 मे रोजी बंद करण्यात आलेल्या बाजार समित्या 24 मे पासून पूर्ववत सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोना नियमांचं पालन करुन बाजार समित्यांमधील कामकाज सुरु आहे.
संबंधित बातम्या:
Onion Price: कांदा महाग होणार का? मागील वर्षीच्या तुलनेत दर दुप्पट
आशिया खंडातील अग्रेसर लासलगाव बाजार समिती तब्बल 7 दिवस बंद, कोट्यवधींची उलाढाल ठप्प, शेतकरी चिंतेत
Onion Price Today Nashik Apmc onion price increased farmers happy for better rates