Onion Rate : कांद्याचा वांदाच..! खरिपात झाले तेच रब्बीत, कांदा दरातील घसरणीमुळे शेतकरी हतबल

महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर केवळ 6 ते 14 रुपये किलो दराने कांदा विकण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी नाफेडने नाफेडने अडीच लाख टन कांद्याची खरेदी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला होता. मात्र, आता हाच कांदा पु्न्हा बाजारात दाखल होत असल्याने दर घसरण्याचा धोका वाढला आहे.

Onion Rate : कांद्याचा वांदाच..! खरिपात झाले तेच रब्बीत, कांदा दरातील घसरणीमुळे शेतकरी हतबल
कांदाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 4:48 PM

लासलगाव : सध्याच्या महागाईत केवळ कांदा हा सर्वसामान्यांना दिलासा देत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाण्यात आणत आहे. गेल्या चार महिन्यांपासून (Onion Rate) दरात सुरु असलेली घसरण आजही कायम आहे. त्यामुळे यंदा सर्वात मोठ्या (Cash Crop) नगदी पिकाचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेलाच नाही. बाजारपेठेतील घटती मागणी आणि वाढते उत्पादन यामुळे गेल्या 5 महिन्यांपासून कांद्याला 15 रुपये किलोपेक्षा अधिकचा दर हा मिळालेलाच नाही.  (Lasalgaon Market) लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला 6 रुपये किलो पासून ते 14 रुपये किलो पर्यंत दर मिळत आहे कांद्याचा भाव एवढा कमी झालाय की उत्पादन खर्चही निघणं मुश्किल झाले आहे. असे असतानाही सध्या राज्यभर कांदा लागवड आणि पेरणीही होत आहे.

नाफेडमुळे आधार अन् नुकसानही

महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर केवळ 6 ते 14 रुपये किलो दराने कांदा विकण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी नाफेडने नाफेडने अडीच लाख टन कांद्याची खरेदी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला होता. मात्र, आता हाच कांदा पु्न्हा बाजारात दाखल होत असल्याने दर घसरण्याचा धोका वाढला आहे. नाफेडने अडीच लाख टन कांद्याची खरेदी केली आहे पुढील महिन्यापासून देशातील मोठ्या मोठ्या शहरांमध्ये नाफेडणे खरेदी केलेला कांद्याचा निकस सुरू होणार आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात कांद्याचा आणखी वांदा होईल असेच चित्र आहे.

शेतकऱ्यांना अपेक्षा वाढीव अनुदानाची

सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस येणारा उन्हाळा कांदा हा मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये चाळीत साठवून ठेवला होता. चांगला दर मिळेल यापेक्षाने अनेक शेतकरी अजूनही कांदा चाळीत साठवून ठेवलेला आहे. मात्र, सततच्या पावसामुळे या कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. इतके दिवस कांदा साठवूनही अपेक्षित दर मिळत नसल्याने केंद्र व राज्य सरकारने कांद्याला किलोला 10 रुपये अनुदान तसेच निर्यातील प्रोत्साहन देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हे सुद्धा वाचा

तरीही कांदा लागवड जोमात

कांद्याला दर नाही म्हणून लागवड क्षेत्र घटले असे नाही. सध्याच्या खरीप हंगामात कांदा लागवड ही महिन्याभराने लांबणीवर पडलेली आहे. शिवाय अधिकच्या पावसामुळे कांदा रोपाचे नुकसान झाले आहे. असे असतानाही शेतकऱ्यांचा भर कांद्यावरच आहे. कांद्याचे दर एका रात्रीतून वाढतात. त्यामुळे फायदा किंवा नुकसान असा विचार करुन शेतकरी कांद्याचे उत्पादन हे घेतातच. तोच प्रकार यंदाही राज्यभर पाहवयास मिळत आहे. त्यामुळे क्षेत्र तर वाढले पण दराचे काय होणार हे पहावे लागणार आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.