Jalna : कांद्याच्या पाठोपाठ आद्रकाच्या दरात घसरण, जालन्यात आद्रकाचे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर
आद्रक विक्रीतून शेतकऱ्यांना कमी उत्पन्न मिळत असले तरी व्यापाऱ्यांची चंगळ झाली आहे. शेतकरी आद्रक आले असतानाच विक्री करतात. आद्रक ओले असताना त्याचे दर कमी असतात. यंदा तर 6 रुपये किलोने आद्रक विकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. तर दुसरीकडे व्यापारी हे आद्रकावर प्रक्रिया करुन परत विक्री करतात. आद्रक काढणीनंतर दोन महिने सुकविले तर तर त्याला अधिकचा दर मिळतो.
जालना : निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेतील दरात घसरण या कचाट्यात सध्या शेतकरी अडकलेला आहे.कमी वेळेत उत्पन्न पदरी पडावे म्हणून कांदा, (Ginger Crop) आद्रक यासारखे (Seasonable Crop) हंगामी पीक घेतले जाते. यंदाही उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी हाच प्रयोग केला मात्र, कांद्याच्या पाठोपाठ आद्रकाचे दर कवडीमोल झाले आहेत. कांदा 100 क्विंटल तर आद्रक हे 600 रुपये क्विंटल असे विकले जात आहे. त्यामुळे अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण जो शेतामध्ये खर्च आणि मेहनत केली आहे त्याचाही मोबदला निघत नाही. (Ginger Rate) आद्रकाच्या बाबतीत तर गेल्या 2 वर्षापासून अशीच स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातून हळूहळू आद्रक हे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. राज्यात आद्रकाची सर्वाधिक लागवड ही औरंगाबाद जिल्ह्यात होते तर त्या पाठोपाठ जालना जिल्ह्यात लागवड केली जाते. दरातील लहरीपणाचा फटका हा शेतकऱ्यांनाच बसत आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान, व्यापाऱ्यांचा फायदा
आद्रक विक्रीतून शेतकऱ्यांना कमी उत्पन्न मिळत असले तरी व्यापाऱ्यांची चंगळ झाली आहे. शेतकरी आद्रक आले असतानाच विक्री करतात. आद्रक ओले असताना त्याचे दर कमी असतात. यंदा तर 6 रुपये किलोने आद्रक विकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. तर दुसरीकडे व्यापारी हे आद्रकावर प्रक्रिया करुन परत विक्री करतात. आद्रक काढणीनंतर दोन महिने सुकविले तर तर त्याला अधिकचा दर मिळतो. पण यासाठी मनुष्यबळ आणि जागेची उपलब्धता आवश्यक असते. शेतकऱ्यांकडे या गोष्टी नसल्यामुळे शेतकरी काढणी झाली की लागलीच विक्री करतो. त्यामुळे मिळेल त्या दरात विक्री करावी लागते.
दोन वर्षापासून आद्रकचे मार्केट डाऊन
संपूर्ण हंगामात किमान एकदा तरी कांदा दरात वाढ होते. या लाटेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना फायदा होतो. मात्र, आद्रकाचे दर गेल्या दोन वर्षापासून कमी आहेत. यंदाही उत्पादन घटल्याने दर वाढतील अशी अपेक्षा होती मात्र, सध्या 6 रुपये किलोप्रमाणे शेतकऱ्यांना विक्री करावी लागते. उत्पादनात सातत्य ठेऊनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. त्यामुळे काळाच्या ओघात आता आद्रकाच्या लागवडीवरच परिणाम होऊ लागला आहे. उत्पादनावर खर्च अधिक आणि उत्पन्न कमी असेच दरवर्षीचे चित्र झाले आहे.
दोन वर्षापूर्वी काय होता दर
शेती व्यवसायावर लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर भावात घसरण सुरूच आहे. दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना 8 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. मात्र आता वाहतूक खर्चही इतका वाढला आहे की, केवळ बाजारपेठेपर्यंतच्या वाहतुकीसाठी 3 ते 4 हजार रुपये खर्ची करावे लगात आहेत. त्यामुळे शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार कसा असा सवाल कायम आहे.