‘कांदा’ पुन्हा रडवतोय, सरकारच्या “नाफेड” ला देखील बसला फटका
नाशिक : कांद्याची पंढरी (Onion) म्हणून ओळख असलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झाल्याने साठवणूक केलेल्या कांद्याला देखील फटका बसू लागला आहे. सरकारी संस्था असलेल्या नाफेडला (Nafed) देखील याचा मोठा फटका बसला आहे. कांद्याच्या बाजारभावात वाढ झाल्यास ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी नाफेड कडून खरेदी करत कांदा साठवून ठेवला जातो. केंद्र सरकारच्या […]
नाशिक : कांद्याची पंढरी (Onion) म्हणून ओळख असलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झाल्याने साठवणूक केलेल्या कांद्याला देखील फटका बसू लागला आहे. सरकारी संस्था असलेल्या नाफेडला (Nafed) देखील याचा मोठा फटका बसला आहे. कांद्याच्या बाजारभावात वाढ झाल्यास ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी नाफेड कडून खरेदी करत कांदा साठवून ठेवला जातो. केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या वतीने किमंत स्थिरीकरण निधी अंतर्गत ही खरेदी केली जाते. यंदा अडीच लाख मॅट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली होती.
कांद्याचे बाजार भाव दहा ते बारा रुपये सरासरी दरावरच स्थिर राहिल्याने पाच महिन्यापूर्वी खरेदी केलेला कांदा हा आता वातावरणातील बदलामुळे खराब होत आहे.
नाफेडच्या गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेला कांदा बाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे यातील 2 हजार मॅट्रिक टन कांदा हा गोडाऊन मधून काढण्यास सुरुवात केली आहे.
देशातील विविध भागांमध्ये 15 दिवसात पाठवण्यात आला आहे. हा कांदा काढताना यात मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाल्याचे आढळून आले आहे.
कांदा अनेक चाळीत साठवलेल्या कांद्यातून काळपट पाणी ही बाहेर पडताना चे चित्र पाहायला मिळते आहे.
मात्र, किती टक्के कांदा खराब झाला आहे हे सध्या स्पष्ट नसले तरी याबाबत लवकरच स्पष्टता येईल. डिसेंबर अखेर संपूर्ण साठवून ठेवलेला कांदा बाहेर काढला जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी देखील कांदा साठवून ठेवला असल्याने त्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसाने वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे, अचानक झालेल्या या बदलामुळे साठवून ठेवलेल्या कांदा सडण्यास सुरुवात झाली आहे.