Gadchiroli : ठसका उठण्यापूर्वीच मिरची पिकाला रोगराईने घेरले, कृषितज्ञांचा महत्वपूर्ण सल्ला?
सध्या बाजारपेठेमध्ये दाखल होत असलेल्या लाल मिरचीला वाढीव दराचा ठसका असला तरी शेतामध्ये उभ्या पिकाचे मोठे नुकसान सुरु आहे. अवकाळी आणि वातावरणातील बदलामुळे झालेल्या परिणामातून भाजीपाल्यांची देखील सुटका झालेली नाही. कारण जिल्ह्यात जोमात असलेल्या मिरचीवर फंगस कीडीचा प्रादुर्भाव झाला असून उत्पादित झालेल्या लाल मिरचीवर काळे धब्बे निर्माण होत आहेत. यामुळे मिरचीच्या दर्जावर परिणाम झाल्यास दरही कमी मिळणार असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
गडचिरोली : सध्या बाजारपेठेमध्ये दाखल होत असलेल्या (Red Chilly) लाल मिरचीला वाढीव दराचा ठसका असला तरी शेतामध्ये उभ्या पिकाचे मोठे नुकसान सुरु आहे. (Untimely Rain) अवकाळी आणि वातावरणातील बदलामुळे झालेल्या परिणामातून भाजीपाल्यांची देखील सुटका झालेली नाही. कारण जिल्ह्यात जोमात असलेल्या मिरचीवर फंगस कीडीचा प्रादुर्भाव झाला असून उत्पादित झालेल्या लाल मिरचीवर काळे धब्बे निर्माण होत आहेत. यामुळे (Chilly Quality) मिरचीच्या दर्जावर परिणाम झाल्यास दरही कमी मिळणार असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. अवकाळीमुळे मुख्य पिकांचे तर नुकसान तर झालेच पण याची भरपाई काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला मात्र, अवकाळी आणि ढगाळ वातावरणामध्ये सातत्या राहिल्याने भाजीपाल्यालाही अवकळाच आलेली आहे. यामुळे उत्पादनात तर मोठी घसरण होणारच आहे पण लागवड आणि पीक जोपासण्यासाठी केलेला खर्च तरी पदरी पडेल की नाही अशी स्थिती आहे.
निम्याने उत्पादन घटण्याची भीती
गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागामधील भामरागड, एटापल्ली अहेरी, मुलचेरा सिरोंचा या भागात मिरची पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भाजीपाल्यातूनही शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळते. यंदा तर भात शेतीचे नुकसान झाल्याने अनेकांनी मिरची पिकावर भर दिला होता. मात्र, ऐन मिरची लागतानाच लाल मिरचीवर काळे धब्बे निर्माण करणारा कीड व फंगस तयार झाला आहे. दरवर्षी या भागातील शेतकऱ्यांना एकरी 15 ते 20 क्विंटलचे उत्पादन होते पण यंदा यामध्ये घट होणार असून 7 ते 8 क्विंटल मिरची पदरी पडेल असा आशावाद शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. रोगराईमुळे हा परिणाम होणार आहे. त्यामुळे मुख्य पिकांचे झालेले नुकसान भरुन काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न अयशस्वी होताना पाहवयास मिळत आहे. मागणी असताना केवळ उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?
मिरची पिकामध्ये स्वच्छता ठेवून पीक तणमुक्त ठेवावे लागणार आहे. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून टाकावीत व जाळून नष्ट करावीत. जेणेकरून या रोगाचा संपूर्ण पिकामध्ये प्रादुर्भाव होणार नाही. रसशोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी गरजेनुसार ऍसिफेट 10 ग्रेम किंवा फिप्रोनिल 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी लागणार आहे. मिरची पीक क्षेत्राच्या कडेला दोन-तीन ओळींमध्ये मका पिकाची लागवड केल्यास रोगराईचा प्रादुर्भाव टळणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना प्रतिक्षा नुकसानभरपाई
निसर्गाच्या अवकृपेमुळे या भागातील मुख्य पीक असलेल्या भात शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, शासनाकडून केवळ मदतीची घोषणा करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात अजूनही अंमलबजावणी ही झालेली नाही. गेल्या तीन महिन्यापासून शेतकरी हे मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. पण घोषणांशिवाय शेतकऱ्यांना काहीच मिळालेले नाही. तर दुसरीकडे मिरचीचेही नुकसान होत असल्याने पीक पध्दतीमधील बदलाचा प्रयोग हा अयशस्वी ठरत आहे.
संबंधित बातम्या :
Soybean Crop : सोयाबीन दरात चढ-उतार, शेतकऱ्यांसह व्यापारीही अडचणीत, काय आहे बाजारपेठेतले वास्तव?
Onion Rate : कांद्याची विक्रमी आवक, चाकण बाजार समितीमध्ये दिवसागणिक दरात होतेय घट..!
Holi Festival : सणामुळे राज्यातील मुख्य बाजार समित्यांचे व्यवहार राहणार बंद, शेतीमालाचे काय?